Value Buying : गेल्या काही दिवसांपासून इराण संकट आणि नफावसुलीमुळे होरपळणाऱ्या शेअर बाजारात गुरुवारी, २ एप्रिल रोजी एक अद्भूत वळण पाहायला मिळाले. सकाळी व्यवहार सुरू होताच १८०० अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स सत्राच्या अखेरीस तब्बल २००० अंकांनी सावरला आणि १८५ अंकांच्या वाढीसह हिरव्या निशाणात बंद झाला. यालाच तांत्रिक भाषेत 'व्हॅल्यू बाइंग' असे म्हटले जाते. पण नक्की काय असते ही 'व्हॅल्यू बाइंग' आणि सामान्य गुंतवणूकदाराने ती कशी ओळखावी?
'व्हॅल्यू बाइंग' म्हणजे नेमके काय?जेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतात, तेव्हा मोठे गुंतवणूकदार त्या संधीचा फायदा घेऊन खरेदी करतात, यालाच 'व्हॅल्यू बाइंग' म्हणतात. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे याच सूत्राचा वापर करून श्रीमंत झाले आहेत.
व्हॅल्यू बाइंग ओळखण्याच्या ४ खुणा
- नाट्यमय रिकव्हरी: जर बाजार सकाळी वेगाने खाली गेला, पण दुपारनंतर अचानक सावरला, तर ते व्हॅल्यू बाइंगचे लक्षण आहे.
- ब्लूचिप कंपन्यांना पसंती: जर खरेदी फक्त चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपन्यांत होत असेल, तर ती 'व्हॅल्यू बाइंग' आहे. याउलट धोकादायक कंपन्यांमधील खरेदीला 'स्पेक्ट्युलेटिव्ह बाइंग' म्हणतात.
- खरेदीदार कोण?: जेव्हा परदेशी गुंतवणूकदार विक्री करत असतात, पण देशातील संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदीचा जोर लावतात, तेव्हा त्याला अस्सल व्हॅल्यू बाइंग मानले जाते.
- प्राइस मूव्हमेंट: घसरलेल्या किमतीत जेव्हा मोठ्या प्रमाणावर वॉल्यूमसह खरेदी होते, तेव्हा तो सकारात्मक संकेत असतो.
२ एप्रिलच्या आकडेवारीचे 'पोस्टमॉर्टम'
गुरुवारच्या बाजारातील आकडेवारी पाहिली तर 'व्हॅल्यू बाइंग'चे चित्र स्पष्ट होते.
- परदेशी गुंतवणूकदार : सुमारे ९,९३१ कोटी रुपयांची मोठी विक्री केली.
- देशांतर्गत गुंतवणूकदार : याच काळात ७,२०८ कोटी रुपयांची जोरदार खरेदी केली.
- यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय गुंतवणूकदारांनी जागतिक भीतीकडे दुर्लक्ष करत स्वस्त झालेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. प्रामुख्याने आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सनी या रिकव्हरीत महत्त्वाची भूमिका बजावली.
गुंतवणूकदारांना काय फायदा?
- कमी जोखीम: शेअर आधीच पडलेला असल्याने त्यामध्ये अधिक घसरणीची शक्यता कमी असते.
- दीर्घकालीन नफा: चांगल्या कंपन्यांचे शेअर्स सवलतीच्या दरात मिळाल्याने भविष्यात त्यावर मोठा परतावा मिळतो.
- स्थैर्य: मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असल्याने पोर्टफोलिओला स्थिरता मिळते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Sensex recovered after a steep fall due to value buying. Identifying fundamentally strong companies at low prices, like IT and banking, can yield long-term profits. Domestic investors countered foreign selling, signaling confidence.
Web Summary : सेंसेक्स वैल्यू बाइंग के कारण भारी गिरावट के बाद उभरा। कम कीमत पर मजबूत बुनियादी कंपनियों, जैसे आईटी और बैंकिंग की पहचान करना, दीर्घकालिक लाभ दे सकता है। घरेलू निवेशकों ने विदेशी बिक्री का मुकाबला किया, जो आत्मविश्वास का संकेत है।