Join us

गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:04 IST

Multibagger Stock : या पॉवर स्टॉकने २ वर्षात ४१५.३९ टक्के आणि तीन वर्षात १६१८ टक्के असा उत्कृष्ट परतावा दिला आहे. १६ मे २०२४ रोजी या कंपनीचा शेअर २,५१९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

Waaree Renewable Technologies Stock : शेअर बाजारात पैसे गुंतवणारा प्रत्येकजण चांगल्या नफ्याच्या शोधात असतो. अनेकदा काही शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतात. तर काही देशोधडीला लावतात. अशा परिस्थितीत योग्य अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे हवेत बाण मारण्यासारखे आहे. आज आम्ही अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक विषयी सांगणार आहोत. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या ५ वर्षात तब्बल ४४,९९९ टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. १६ मे २०२५ रोजी, मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा पॉवर स्टॉक १.५१ टक्क्यांनी वाढून १०२८.२५ रुपयांवर बंद झाला.

१ लाखाचे झाले ४.९९ कोटी!ही कंपनी दुसरी-तिसरी कोणती नसून 'वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज' (Waaree Renewable Technologies) आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या कंपनीत फक्त १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या गुंतवणुकीची किंमत तब्बल ४.९९ कोटी रुपये झाली असती. म्हणजेच, तो माणूस करोडपती बनला असता!

नवीन ऑर्डर आणि दमदार नफावारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजने शेअर बाजाराला नुकतीच माहिती दिली आहे की त्यांना एका रिन्यूएबल एनर्जी कंपनीकडून ११४.२३ कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. बीएसईच्या वेबसाइटनुसार, ही ऑर्डर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आहे आणि हे काम २०२५-२६ या आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीच्या आर्थिक नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा ९३.८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, तर मागील वर्षी याच काळात हा नफा ५१.३ कोटी रुपये होता. म्हणजेच, चौथ्या तिमाहीत नफ्यात जवळपास ६८ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, संपूर्ण २०२५ या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा १४५.२ कोटी रुपयांवरून २२८.९२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल जानेवारी-मार्च तिमाहीत २७३.३ कोटी रुपयांवरून वार्षिक आधारावर ४७६.६० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शेअरची दमदार कामगिरीया पॉवर स्टॉकने गुंतवणूकदारांना केवळ ५ वर्षातच नाही, तर कमी कालावधीतही चांगला परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षात या शेअरने ४१५.३९ टक्के आणि तीन वर्षात १६१८ टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर १६ मे २०२४ रोजी २,५१९.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता, तर ७ एप्रिल २०२५ रोजी तो ७३२.०५ रुपयांवर आला होता, जो त्याच्या उच्चांकापेक्षा ६० टक्क्यांनी कमी होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या शेअरने चांगली वाढ दर्शवली आहे.

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील या कंपनीच्या भविष्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा - EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स

महत्त्वाची सूचना: शेअर बाजारात गुंतवणूक करणे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. भूतकाळातील परतावा भविष्यात कायम राहील याची कोणतीही खात्री नसते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही केवळ माहितीसाठी दिलेली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी