Virtual Galaxy Infotech IPO : गेल्या आठवड्यात एथर एनर्जीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना निराश केले असले तरी, आता तुमच्यासाठी आणखी एक चांगली संधी चालून आली आहे. व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेक (Virtual Galaxy Infotech) या SME कंपनीचा आयपीओ लवकरच लिस्ट होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये (GMP) त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेकचा आयपीओ ९ मे रोजी खुला झाला होता आणि १४ मे रोजी बंद झाला. आता तो १९ मे २०२५ रोजी शेअर बाजारात लिस्ट होईल.
प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान ८७ हजारांचा नफा होण्याची शक्यताया कंपनीने आपले सर्व शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे (नवीन शेअर्स जारी करून) विकले आहेत. कंपनीने एकूण ६५.७ लाख शेअर्स जारी करून ९३.२९ कोटी रुपये उभारले आहेत. प्रत्येक शेअरची किंमत १४२ रुपये होती. ग्रे मार्केट प्रीमियमनुसार (GMP), या आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांना एक लॉट (1000 शेअर्स) मिळाला आहे, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी किमान ८७,००० रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे.
GMP म्हणजे काय?व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेकचा GMP सध्या प्रति शेअर ८७ रुपये आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये १००० शेअर्स आहेत. त्यामुळे, ज्या गुंतवणूकदारांनी एक लॉटसाठी अर्ज केला होता, त्यांना अंदाजे ८७ रुपये प्रति शेअर म्हणजेच ८७,००० रुपये प्रति लॉट नफा मिळू शकतो.
कंपनी काय काम करते?व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेक ही एक आयटी (IT) सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. १९९७ मध्ये नागपूरमध्ये तिची स्थापन झाली. ही कंपनी बँकिंग आणि वित्त, ईआरपी (ERP), ई-गव्हर्नमेंट, वेब सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा (Big Data), आयओटी (IoT) आणि सिस्टम इंटिग्रेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा पुरवते.
गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसादया आयपीओला गुंतवणूकदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ एकूण २३१.४५ पट सबस्क्राइब झाला होता. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव भाग १२९.७२ पट, नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी (NIIs) ५९०.२७ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी १३४.०३ पट बोली लावली होती.
किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त एका लॉटसाठी (१००० शेअर्स, किंमत १.४२ लाख रुपये) अर्ज करण्याची परवानगी होती, तर बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांना किमान दोन लॉटसाठी (२००० शेअर्स, किंमत २.८४ लाख रुपये) अर्ज करणे आवश्यक होते. या कंपनीचे शेअर्स एनएसई (NSE) वर लिस्ट होणार आहेत.