Join us

3 वर्षांत रॉकेट बनला 'या' कंपनीचा शेअर, तब्बल 410% रिटर्न्स; गुंतवणूकदार मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:44 IST

Varun Beverages share price: शेअर बाजारात काही शेअर्स कमी कालावधीत मोठी कमाई करुन देतात.

Varun Beverages share price: शेअर बाजारात काही शेअर्स अल्पावधीत मोठी कमाई करुन देतात. वरुण बेव्हरेजेस लिमिटेडच्या शेअर्सनेही गेल्या तीन वर्षांत मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत. 14 ऑगस्ट 2020 रोजी 169.85 रुपयांवर क्लोज झालेला वरुण बेव्हरेजेसचा स्टॉक 14 ऑगस्ट, 2023 867.40 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच, अवघ्या तीन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 410% रिटर्न्स दिले. 

सुरुवातीचे दोन वर्षे आणि तिसऱ्या वर्षाच्या कालावधीत, स्टॉक अनुक्रमे 235.49% आणि 69.10% वर चढला. हा स्टॉक 22 ऑगस्ट 2022 रोजी 454 रुपयांच्या वार्षिक नीचांकीवर पोहोचला होता, तर 26 मे 2023 रोजी 873.58 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. 14 ऑगस्ट रोजी वरुण बेव्हरेजेसचे शेअर्स BSE वर 2% पेक्षा जास्त, 867.40 रुपयांवर बंद झाले. 

कंपनीचे मार्केट कॅप 1.12 लाख कोटींनी वाढले वरुण बेव्हरेजेसचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 69 वर आहे, ज्यातून सूचित होते की, हा स्टॉक जास्त विकला गेला नाही किंवा जास्त खरेदीही झालेला नाही. स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.8 आहे, जो या कालावधीत कमी अस्थिरता दर्शवतो. वरुण बेव्हरेजेसचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहे. कंपनीचे एकूण 0.75 लाख शेअर्स बदलले, ज्यामुळे BSE वर 6.48 कोटी रुपयांची उलाढाल झाली. कंपनीचे मार्केट कॅप 1.12 लाख कोटी रुपये झाले.

(डिस्क्लेमर- वरील माहिती शेअर्सच्या कामगिरीबद्दल आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक