US Stock Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तिथले सर्वोच्च न्यायालय यांच्यातील 'टॅरिफ' युद्धाचा आता भडका उडाला आहे. त्याचे थेट पडसाद जागतिक शेअर बाजारावर उमटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ आदेश बेकायदेशीर ठरवल्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी नव्या धमक्यांचे सत्र सुरू केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, सोमवारी अमेरिकन शेअर बाजार जोरदार कोसळला.
अमेरिकन बाजारात हाहाकार सोमवारी अमेरिकन बाजारात मोठी विक्री पाहायला मिळाली. टॅरिफवरून सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला आहे. डाऊ जोन्स ८२१.९१ अंकांनी कोसळून ४८,८०४.०६ च्या पातळीवर बंद झाला. नॅस्डॅक तंत्रज्ञान कंपन्यांच्या या निर्देशांकात २५८.७९ अंकांची घसरण झाली. तर एस अँड पी ५०० हा निर्देशांक १.०४% घसरून ६,८३७.७५ वर स्थिरावला.
सर्वोच्च न्यायालयात हार, पण ट्रम्प यांचे 'टॅरिफ' अस्त्र सुरूचसुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचे जुने टॅरिफ आदेश रद्द केल्यावर ट्रम्प यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीला १०% टॅरिफ लावला आणि अवघ्या २४ तासांत तो वाढवून १५% केला. हा टॅरिफ 'कलम १२२' अंतर्गत कमाल मर्यादेत आहे. "न्यायालयाच्या निर्णयाचा फायदा घेऊन जर कोणताही देश अमेरिकेच्या व्यापाराला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांच्यावर आधीपेक्षा जास्त टॅरिफ लावला जाईल," अशी उघड धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
आशियाई बाजारात संमिश्र कल ट्रम्प यांच्या भूमिकेचे पडसाद मंगळवारी सकाळी आशियाई बाजारात संमिश्र स्वरूपात उमटले. हाँगकाँगच्या हँगसेंग बाजार ५४० पेक्षा जास्त अंकांनी (२%) कोसळून २६,५४१ वर व्यवहार करत होता. मात्र, जपानी बाजार ४३० अंकांच्या वाढीसह वेगाने धावताना दिसला. जर्मनीचा DAX (१.०६% घट) आणि फ्रान्सचा CAC निर्देशांक देखील लाल निशाण्यावर व्यवहार करत होते.
भारतीय बाजारासाठी 'गिफ्ट निफ्टी'चे संकेत काय?ट्रम्प यांनी १५% टॅरिफ जाहीर केल्यानंतरही सोमवारी भारतीय शेअर बाजाराने (सेन्सेक्स-निफ्टी) चांगली तेजी दाखवली होती. मंगळवारी आशियाई बाजारातील संकेत संमिश्र असले, तरी गिफ्ट निफ्टी सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. हे भारतीय बाजारासाठी सकारात्मक मानले जात आहे. मात्र, जागतिक तणावामुळे सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने महागाईचा धोका कायम आहे.
Web Summary : Trump's tariff disputes with the Supreme Court triggered a global market sell-off. US stocks plummeted, while Asian markets showed mixed signals. Despite this, Indian markets initially showed resilience, but inflation risks remain due to rising gold prices.
Web Summary : ट्रंप के सुप्रीम कोर्ट के साथ टैरिफ विवादों से वैश्विक बाजार में गिरावट आई। अमेरिकी शेयर बाजार लुढ़का, जबकि एशियाई बाजारों में मिश्रित संकेत दिखे। इसके बावजूद, भारतीय बाजारों ने शुरुआत में लचीलापन दिखाया, लेकिन सोने की कीमतें बढ़ने से मुद्रास्फीति का खतरा बना हुआ है।