Join us

अमेरिकन फेडचा परिणाम,  Sensex-Nifty मध्ये तेजी; गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.७१ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 09:44 IST

Sensex-Nifty Green Starts: बहुतांश बाजारांमधील जोरदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातही उत्साह दिसत असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे.

Sensex-Nifty Green Starts: बहुतांश बाजारांमधील जोरदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातही उत्साह दिसत असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीच्या अपेक्षेनं बाजारात उत्साह दिसून आला. फार्मा वगळता निफ्टीतील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. निफ्टी फार्मामध्येही किंचित घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्डेट कंपन्यांचे मार्केट कॅप १.७१ लाख कोटी रुपयांनी वाढलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.७१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स २४९.१० अंकांनी म्हणजेच ०.३१ टक्क्यांनी वधारून ८१,३३५.३१ वर आणि निफ्टी ५० हा ८३.०५ अंकांनी म्हणजेच ०.३३ टक्क्यांनी वधारून २४,९०६.२० वर बंद झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स ८१,०८६.२१ वर आणि निफ्टी २४,८२३.१५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.७१ लाख कोटींची वाढ

एक दिवसापूर्वी म्हणजे २३ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,५९,९६,५४८.९८ कोटी रुपये होतं. आज २६ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६१,६७,८६२.८८ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,७१,३१३.९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे २२ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २२ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचडीएफसी बँकचे शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे आयटीसी, एशियन पेंट आणि मारुतीचे शेअर्स सर्वाधिक घसरले. एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, बजाजा फिनसर्व्ह, टायटन, रिलायन्स, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक