Urban Company IPO: अर्बन कंपनी त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे (IPO) मोठी रक्कम उभारण्याची तयारी करत आहे. ऑनलाइन होम आणि ब्युटी सेवा पुरवणारी ही कंपनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, क्लाउड इन्फ्रास्टक्चर मजबूत करण्यासाठी तसंच लीज पेमेंट आणि मार्केटिंगच्या कामांसाठी ४७२ कोटी रुपयांची नवीन इक्विटी उभारेल. याशिवाय, कंपनी ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) १,४२८ कोटी रुपयांपर्यंत उभारण्याची योजना आखत आहे. या IPO नंतर, प्रमोटर्सचा हिस्सा २०.४% पर्यंत कमी होईल, जो सध्या २१.१% आहे. पहिल्याच दिवशी आयपीओबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. आयपीओ उघडल्यानंतर २ तासांच्या आत पूर्णपणे सबस्क्राइब झाला. रिटेल आणि एनआयआय (नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर) श्रेणी पूर्णपणे सबस्क्राइब झाल्या.
आर्थिक दृष्टिकोनातून, कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२३ ते २०२५ दरम्यान ३४.१% नं वाढून १,१४४.५ कोटी रुपये झाला आहे. तथापि, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ पासूनच नफा नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जून २०२५ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वर्षानुवर्षे ४५% कमी झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सध्याचं मूल्यांकन अधिक आहे आणि ते फक्त उच्च-जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य असू शकतं.
अर्बन कंपनी सध्या होम क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, प्लंबिंग, कारपेंटी, अप्लायन्सेस सर्व्हिसिंग आणि विद्युत इलेक्ट्रिकल रिपेरिंग यासारख्या सेवा तसंच रंगकाम, स्किनकेअर आणि मसाज थेरपी यासारख्या सेवा पुरवते. याशिवाय, कंपनीने 'नेटिव्ह' ब्रँड अंतर्गत वॉटर प्युरिफायर (FY23) आणि इलेक्ट्रॉनिक डोअर लॉक (FY24) देखील लाँच केलेत. जून २०२५ पर्यंत, कंपनी ४७ भारतीय शहरांमध्ये आणि UAE आणि सिंगापूरमधील ४ शहरांमध्ये सक्रिय आहे. याशिवाय, कंपनीचा सौदी अरेबियामध्ये संयुक्त उपक्रम देखील आहे.
अधिक माहिती काय?आर्थिक वर्ष २३ ते २०२५ दरम्यान निव्वळ व्यवहार मूल्य (NTV) २५.५% वाढून ३,२७०.९ कोटी रुपये झालं. जून २०२५ च्या तिमाहीत एनटीव्ही आणि महसूल अनुक्रमे २०% आणि ३०.८% वाढून अनुक्रमे १,०३०.६ कोटी रुपये आणि ३६७.३ कोटी रुपये झाले. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २३९.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये त्यांना ३१२.५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. अॅडजस्टेड Ebitda देखील आर्थिक वर्ष २३ मध्ये २९७.७ कोटी रुपयांच्या तोट्यावरून आर्थिक वर्ष २५ मध्ये १२.१ कोटी रुपयांच्या नफ्यात आलाय.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)