Urban Company IPO Listing: ऑनलाइन मार्केटप्लेस अर्बन कंपनीच्या शेअर्सनी आज देशांतर्गत बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली. त्यांच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि एकूणच तो १०८ पटीपेक्षा अधिक बोली मिळाल्या. आयपीओ अंतर्गत शेअर्स १०३.०० रुपयांच्या किमतीत जारी करण्यात आले. आज ते बीएसईवर ₹१६१ आणि एनएसईवर ₹१६२.२५ रुपयांवर लिस्ट झाले. याचा अर्थ आयपीओमधील गुंतवणूकदारांना ५६% पेक्षा जास्त लिस्टिंग गेन (Urban Company Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर, शेअर्समध्ये आणखी वाढ झाली. बीएसईवर ते ₹१७२.१५ (Urban Company Share Price) पर्यंत वाढले, याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदार आता ६७.१४% नफ्यात आहेत. कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स ९ रुपयांच्या सवलतीत मिळाल्यानं त्यांना आणखी नफा झाला आहे.
Urban Company IPO चे पैसे कुठे खर्च होणार?
अर्बन कंपनीचा ₹१,९००.२४ कोटींचा आयपीओ (IPO) १० ते १२ सप्टेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. गुंतवणूकदारांकडून या IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला, एकूण १०८.९८ पट सबस्क्राइब करण्यात आला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव असलेला भाग १४७.३५ वेळा (एक्स-अँकर), गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) राखीव असलेला भाग ७७.८२ वेळा सबस्क्राइब करण्यात आला, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला भाग ४१.४९ पट सबस्क्राइब करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला भाग ४२.५५ पट सबस्क्राइब करण्यात आला.
काय करते कंपनी?
अर्बन कंपनी सध्या होम क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, प्लंबिंग, कारपेंटी, अप्लायन्सेस सर्व्हिसिंग आणि विद्युत इलेक्ट्रिकल रिपेरिंग यासारख्या सेवा तसंच रंगकाम, स्किनकेअर आणि मसाज थेरपी यासारख्या सेवा पुरवते. याशिवाय, कंपनीने 'नेटिव्ह' ब्रँड अंतर्गत वॉटर प्युरिफायर (FY23) आणि इलेक्ट्रॉनिक डोअर लॉक (FY24) देखील लाँच केलेत. जून २०२५ पर्यंत, कंपनी ४७ भारतीय शहरांमध्ये आणि UAE आणि सिंगापूरमधील ४ शहरांमध्ये सक्रिय आहे. याशिवाय, कंपनीचा सौदी अरेबियामध्ये संयुक्त उपक्रम देखील आहे.
अधिक माहिती काय?
आर्थिक वर्ष २३ ते २०२५ दरम्यान निव्वळ व्यवहार मूल्य (NTV) २५.५% वाढून ३,२७०.९ कोटी रुपये झालं. जून २०२५ च्या तिमाहीत एनटीव्ही आणि महसूल अनुक्रमे २०% आणि ३०.८% वाढून अनुक्रमे १,०३०.६ कोटी रुपये आणि ३६७.३ कोटी रुपये झाले. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २३९.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये त्यांना ३१२.५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. अॅडजस्टेड Ebitda देखील आर्थिक वर्ष २३ मध्ये २९७.७ कोटी रुपयांच्या तोट्यावरून आर्थिक वर्ष २५ मध्ये १२.१ कोटी रुपयांच्या नफ्यात आलाय.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)