New IPOs List 2026 : सरत्या २०२५ सालात आयपीओ बाजाराने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आता नव्या दमाने सुरू होणारे २०२६ साल देखील गुंतवणूकदारांसाठी संधीची खाण ठरणार आहे. टेलिकॉम, ई-कॉमर्स, पेमेंट ॲप्स आणि कंझ्युमर ब्रँड्स अशा विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले 'पब्लिक इश्यू' आणण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सर्वात मोठे आकर्षण असेल ते म्हणजे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओची संभाव्य लिस्टिंग.
रिलायन्स जिओ आणि फ्लिपकार्टवर सर्वांचे लक्ष२०२६ च्या पहिल्या सहामाहीत रिलायन्स जिओची लिस्टिंग होऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत. जरी अधिकृत तारीख जाहीर झाली नसली, तरी भारतीय शेअर बाजारातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, फ्लिपकार्टनेही भारतात आपले मुख्य कार्यालय (डोमिसाईल) हलवून आयपीओची तयारी सुरू केली आहे.
NSE आणि PhonePe रिंगणातअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एनएसईचा आयपीओ आता 'सेबी'च्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. गव्हर्नन्सचे प्रश्न सुटल्याने गुंतवणूकदार या मेगा इश्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे वॉलमार्टच्या पाठबळावर चालणाऱ्या फोन पे या पेमेंट ॲप कंपनीने 'कॉन्फिडेंशियल' पद्धतीने कागदपत्रे दाखल केली आहेत.
झेप्टो, ओयो आणि बोटची एन्ट्रीक्विक कॉमर्स क्षेत्रात धुमाकूळ घालणारी झेप्टो सुमारे ११,००० कोटी रुपये उभारण्यासाठी सज्ज आहे. तसेच, ओयो आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड बोट देखील २०२६ मध्ये शेअर बाजारात पदार्पण करतील. 'बोट'ची मूळ कंपनी 'इमॅजिन मार्केटिंग'ने आपले सुधारित ड्राफ्ट पेपर्स सेबीकडे जमा केले आहेत. याशिवाय हीरो फिनकॉर्प देखील रांगेत आहे.
वाचा - बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
पुढील आठवड्यातील घडामोडी (२९ डिसेंबर - २ जानेवारी)नवीन आयपीओ : 'मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर'चा आयपीओ ३१ डिसेंबर २०२५ रोजी उघडेल आणि २ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल.लिस्टिंग अपडेट्स : ३० डिसेंबर रोजी 'गुजरात किडनी' मेनबोर्डवर लिस्ट होईल. याच दिवशी ईपीडब्ल्यू इंडिया, श्याम धानी आणि सुंदरेक्स ऑईल या कंपन्यांचे पदार्पण होईल. ३१ डिसेंबर रोजी धारा रेल प्रोजेक्ट्स आणि नांता टेकसह अन्य काही कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे.
Web Summary : 2026 promises IPO riches! Jio, Flipkart, PhonePe, Zepto, and others are expected to launch, offering investors golden opportunities in booming sectors.
Web Summary : 2026 में आईपीओ की बहार! जियो, फ्लिपकार्ट, फोनपे, ज़ेप्टो समेत कई कंपनियों के आईपीओ आने की संभावना, निवेशकों के लिए सुनहरा अवसर।