Join us

पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:49 IST

पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आयपीओद्वारे मोठी संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात एकूण २२ कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत असून, यातून सुमारे ५००० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आयपीओद्वारे मोठी संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात एकूण २२ कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत असून, यातून सुमारे ५००० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. यात ८ कंपन्यांचे आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटमध्ये, तर १४ कंपन्यांचे आयपीओ एसएमई सेगमेंटमध्ये खुले होतील. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

मेनबोर्ड सेगमेंटमधील कंपन्या

पुढील आठवड्यात मेनबोर्ड सेगमेंटमध्ये मोठ्या कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यात Seshaasai Technologies चा आयपीओ सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांचा असेल. त्यानंतर आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंगचा ७४५ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात येईल. याशिवाय, Epack Prefab Technologies (५०४ कोटी रुपये), सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स (४९० कोटी रुपये), जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (४५० कोटी रुपये), गणेश कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (४०९ कोटी रुपये) आणि जिनकुशल इंडस्ट्रीज (११६ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

कधीपर्यंत आहे गुंतवणूकीची संधी?

अटलांटा इलेक्ट्रिकल्स आणि गणेश कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे आयपीओ २२ सप्टेंबरपासून खुले होतील. तर जारो इन्स्टिट्यूट, सोलरवर्ल्ड एनर्जी, आनंद राठी ब्रोकिंग आणि Seshaasai Technologies चे आयपीओ २३ सप्टेंबरपासून सुरू होतील. या सर्वांवर २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. Epack Prefab Technologies चा आयपीओ २४ ते २६ सप्टेंबरपर्यंत खुला राहील, तर जिनकुशल इडस्ट्रीजमध्ये २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

एसएमई सेगमेंटमधील कंपन्या

या आठवड्यात एसएमई सेगमेंटमधील १४ कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. यात प्राइम केबल इंडस्ट्रीज आणि सोवेक्स इडिबिल्सचे आयपीओ २२ ते २४ सप्टेंबरपर्यंत खुले असतील. BharatRohan Airborne Innovations, Aptus Pharma, ट्रू कलर्स, मॅट्रिक्स जिओ सोल्युशन्स, एनएसबी बीपीओ सोल्युशन्स आणि इकोलाइन एक्झिम हे आयपीओ २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहेत.

त्याचप्रमाणे, सिस्टमॅटिक इंडस्ट्रीज, जस्टो रिअलफिनटेक आणि प्रारूह टेक्नॉलॉजीजमध्ये २४ ते २६ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. टेलगे प्रॉजेक्ट्स आणि डीएसएम फ्रेश फूड्स चे आयपीओ अनुक्रमे २५ ते २६ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार