Join us

पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:29 IST

IPO : मेनबोर्ड आणि एसएमई कंपन्या प्राथमिक बाजारात प्रवेश करणार असल्याने येत्या आठवड्यात आयपीओमध्ये वाढ दिसून येईल.

IPO : तुम्ही जर शेअर बाजारातून पैसे कमावण्याची संधी शोधत असाल तर ती वेळ आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कंपन्यांचे IPO सातत्याने येत आहेत. आता पुढील आठवडा (२१ ते २५ जुलै २०२५) तर IPO च्या बाबतीत खूपच 'बिझी' राहणार आहे, कारण तब्बल १० कंपन्यांचे IPO शेअर बाजारात येणार आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची भरपूर संधी मिळणार आहे.

मेनबोर्ड (मुख्य) शेअर बाजारात येणारे IPOपुढील आठवड्यात मुख्य शेअर बाजारात (BSE/NSE) येणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हे समाविष्ट आहेत.

  • अँथम बायोसायन्सेस : यांचा IPO सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी बाजारात दाखल होईल.
  • इंडिक्यूब स्पेसेस : यांचा ७०० कोटी रुपयांचा IPO बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी लाँच होईल. यात प्रति शेअर २२५ ते २३७ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
  • जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स : यांचा ४६० कोटी रुपयांचा IPO देखील बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी येईल. यांचाही प्राइस बँड २२५ ते २३७ रुपये प्रति इक्विटी शेअर आहे.
  • ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स : यांचा ७५९.६० कोटी रुपयांचा IPO गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी येण्याची शक्यता आहे.
  • शांती गोल्ड इंटरनॅशनल : यांचा IPO शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी लाँच होईल. यात १,८०,९६,००० नवीन इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
  • PropShares Titania IPO: हा प्रॉपर्टी शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ४७३ कोटी रुपयांचा IPO २१ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल, जो २५ जुलै रोजी बंद होईल. याचा प्राइस बँड १० ते १०.६ लाख रुपये प्रति युनिट आहे.

SME (लघु आणि मध्यम उद्योग) प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणाऱ्या कंपन्या

  • लघु आणि मध्यम उद्योगांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवर (BSE SME आणि NSE SME) पुढील आठवड्यात पाच कंपन्या पदार्पण करतील.
  • सॅव्ही इन्फ्रा अँड लॉजिस्टिक्स : रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारी ही कंपनी ६९.९८ कोटी रुपयांचा IPO सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी लाँच करेल. प्राइस बँड ११४ ते १२० रुपये असेल.
  • स्वस्तिका कॅसल : अभियांत्रिकी भाग बनवणारी ही कंपनी प्रति शेअर ६५ रुपये या किमतीत १४.०७ कोटी रुपयांचा IPO सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी आणेल.
  • मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स : ही कंपनी मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी ९३.७५ कोटी रुपयांचा IPO लाँच करेल, ज्याची इश्यू किंमत २३७ ते २५० रुपयांदरम्यान असेल.
  • टीएससी इंडिया : टेक आणि सर्टिफिकेशन सर्व्हिसेस देणारी ही फर्म बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी ६८ ते ७० रुपयांच्या प्राइस बँडसह २५.८९ कोटी रुपयांचा IPO लाँच करेल.
  • पटेल केम स्पेशालिटीज : औषधनिर्माण आणि विशेष रसायने बनवणारी ही कंपनी २५ जुलै रोजी ५८.८० कोटी रुपयांचा IPO लाँच करेल. याचा किंमत पट्टा ८२ ते ८४ रुपये असेल.
  • स्पनवेब नॉनवोवन : यांचा IPO २१ जुलै रोजी BSE SME वर अपेक्षित आहे.
  • मोनिका अल्कोबेव्ह : यांचा IPO २३ जुलै रोजी NSE SME प्लॅटफॉर्मवर पदार्पण करेल.

वाचा - पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?

या सर्व कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे बाजारात चांगलीच उत्साहाची लाट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक