Join us

₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:20 IST

Stock To Buy:  टायर उत्पादक कंपनीच्या शेअरवर बाजार विश्लेषक बुलिश दिसत असून ते खरेदीचा सल्ला देत आहेत.

Stock To Buy:  टायर उत्पादक कंपनीच्या शेअरवर बाजार विश्लेषक बुलिश दिसत असून ते खरेदीचा सल्ला देत आहेत. हा शेअर देशातील सर्वात महागडा स्टॉक आहे. आम्ही एमआरएफ लिमिटेडच्या (MRF Shares) शेअर्सबद्दल बोलत आहोत. कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. कंपनीचा शेअर गुरुवारी इंट्राडे उच्चांकी पातळीवर १४३२४८.७५ रुपयांवर पोहोचला. मार्च तिमाहीच्या प्रभावी निकालानंतर ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं गुरुवारी, ८ मे रोजी एका नोटमध्ये टायर उत्पादक एमआरएफ लिमिटेडच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची तेजी दिसण्याची शक्यता व्यक्त केली.

टार्गेट प्राइस काय?

सीएलएसएचे एमआरएफवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग आहे आणि या शेअरवरील टार्गेट प्राइस ३० टक्क्यांनी वाढवून १,२८,५९९ रुपयांवरून १,६८,४२६ रुपये प्रति शेअर करण्यात आलीये. ही किंमत सध्याच्या पातळीपेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे. सीएलएसएनं दिलेलं टार्गेट एमआरएफसाठी बाजारात सर्वात जास्त आहे, जे आनंद राठी यांच्या १,६५,००० रुपयांपेक्षा अधिक आहे.

१०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 

सीएलएसएनं, कच्च्या मालाच्या कमी किंमती आणि डिसेंबर तिमाहीत कंपनीनं केलेल्या किंमत वाढीमुळे ग्रॉस मार्जिनमध्ये वाढ झाल्यानं एमआरएफचे निकाल सर्वमान्य अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचं म्हटलंय. इनपुट कॉस्ट विशेषत: कच्च्या तेलावर आधारित डेरिव्हेटिव्हजमध्ये घसरण होत असल्याने ग्रॉस मार्जिन मध्ये वाढ होत राहील, ज्याचा सप्टेंबर तिमाहीपासून अधिक परिणाम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

सीएलएसए आणि आनंद राठी यांच्यासह अॅक्सिस सिक्युरिटीजनेही एमआरएफवरील आपलं टार्गेट १,२३,००० रुपयांवरून १,५१,००० रुपयांपर्यंत वाढवलं आहे. एमआरएफनं बुधवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, जे ब्लूमबर्गच्या सर्वमान्य अपेक्षांपेक्षा लक्षणीय चांगले होते, विशेषत: एबिटडा आणि मार्जिन आघाडीवर निकाल उत्तम होते. कंपनीनं आपला आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश २२९ रुपये प्रति शेअर जाहीर केला आहे. एमआरएफ कव्हर करणाऱ्या ११ विश्लेषकांपैकी सात विश्लेषकांनी शेअरवर 'सेल' रेटिंग दिलंय, तर तीन जणांनी 'बाय' रेटिंग आणि एकानं 'होल्ड' रेटिंग दिलंय. एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये २५ टक्के म्हणजेच २८,७५२.६० रुपयांची वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक