Join us

ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:48 IST

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा झटका; जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण!

America-China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिका आणि चीनच्या शेअर मार्केटपासून ते क्रिप्टोकरन्सी बाजारापर्यंत सर्वत्र हाहाकार माजला आहे. 

क्रिप्टो मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटने एका दिवसातच सुमारे 560 अब्ज डॉलर (₹46.8 लाख कोटी रुपये) गमावले. बिटकॉइन, एथेरियम, डॉजकॉइन यांसारख्या प्रमुख डिजिटल करन्सी कोसळल्या.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या निर्णयाचा परिणाम जगभरातील 16 लाखांहून अधिक क्रिप्टो गुंतवणूकदारांवर झाला. केवळ एका तासातच 7 अब्ज डॉलरच्या पोझिशन्स जबरदस्तीने संपवाव्या लागल्या. एकूण 19 अब्ज डॉलरचे लिक्विडेशन झाले. डिजिटल अॅसेट्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक विक्री मानली जात आहे.

प्रमुख कॉइन्समध्ये मोठी पडझड

ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात आपली लीव्हरेज्ड पोझिशन्स संपवत असल्यामुळे क्रिप्टो ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये 145% वाढ झाली आहे. कॉइनमार्केटकॅपच्या मते, क्रिप्टो मार्केट कॅप एका दिवसात $4.30 ट्रिलियन वरून $3.74 ट्रिलियनवर घसरले आहे.

शेअर मार्केटलाही धक्का

क्रिप्टोबरोबरच अमेरिकन शेअर बाजारातही घसरणीची लाट आली. NVIDIA, Tesla, Amazon यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर जबरदस्त दबाव दिसला.शेअर मार्केटमधील अंदाजे नुकसान 1.75 ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. म्हणजेच, क्रिप्टो आणि शेअर बाजार मिळून गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान सुमारे 2 ट्रिलियन डॉलर (₹177 लाख कोटी रुपये) झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणाट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की, “1 नोव्हेंबर 2025 पासून चीनमधून आयात होणाऱ्या सर्व ‘महत्त्वाच्या सॉफ्टवेअर आणि वस्तूं’वर 100% टॅरिफ लागू होईल.” हा निर्णय चीनने रेअर अर्थ मटेरियल्सवर निर्यात निर्बंध आणल्यानंतर घेतला गेला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारतणाव पुन्हा तीव्र झाला असून, जागतिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's 100% China Tariff Triggers Market Crash, $2 Trillion Lost

Web Summary : Trump's tariff announcement caused global market turmoil. Crypto and stocks plummeted, wiping out $2 trillion. Bitcoin crashed, and major tech shares like NVIDIA fell sharply. Trade tensions escalate.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाचीनशेअर बाजारस्टॉक मार्केटक्रिप्टोकरन्सी