Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मंदीचे सावट पाहायला मिळाले. मंगळवारी (६ जानेवारी) सुरुवातीपासूनच बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल निशाणीत बंद झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 'टॅरिफ' वाढवण्याबाबत दिलेल्या संकेतांमुळे आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सुमारे १.३५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
बाजाराची आजची आकडेवारी
- बीएसई सेन्सेक्स : ३७६.२८ अंकांनी घसरून ८५,०६३.३४ वर बंद.
- निफ्टी ५० : ७१.६० अंकांनी घसरून २६,१७८.७० वर स्थिरावला.
- गुंतवणूकदारांचे नुकसान : बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ४८०.८० लाख कोटींवरून ४७९.४५ लाख कोटींवर आले.
क्षेत्रीय कामगिरीआजच्या सत्रात ऑईल अँड गॅस आणि एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली. इन्फ्रा, मीडिया आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकही ०.६ टक्क्यांहून अधिक घसरले. मात्र, आयटी, फार्मा, पीएसयू बँक आणि मेटल इंडेक्समध्ये १.७ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आल्याने बाजाराला काहीसा आधार मिळाला.
वधारलेले आणि घसरलेले शेअर्सटॉप ५ गेनर्स (सेंसेक्स)
- ICICI बँक : +२.८७%
- हिंदुस्तान युनिलिव्हर : +१.७५%
- सन फार्मा : +१.५०%
- स्टेट बँक : +१.४०%
- टीसीएस : +१.२८%
टॉप ५ लूझर्स (सेंसेक्स)
- ट्रेंट : -८.६२% (सर्वात मोठी घसरण)
- रिलायन्स इंडस्ट्रीज : -४.४२%
- इंडिगो : -३.५०%
- आयटीसी : -२.१५%
- कोटक महिंद्रा बँक : -१.८१%
व्यवहारांची स्थितीआज बीएसईवर एकूण ४,३४९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,६६१ शेअर्स वधारले, तर २,५२० शेअर्समध्ये घसरण झाली. १६८ शेअर्स स्थिर राहिले. विशेष म्हणजे, १४३ शेअर्सनी आपला ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १२५ शेअर्सनी नीचांकी स्तर गाठला.
Web Summary : Indian stock markets faced a second consecutive day of decline. Investors lost ₹1.35 lakh crore due to selling pressure and global cues. Oil & Gas shares saw the biggest dip, while IT and Pharma gained some ground.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में लगातार दूसरे दिन गिरावट दर्ज की गई। निवेशकों को बिकवाली के दबाव और वैश्विक संकेतों के कारण ₹1.35 लाख करोड़ का नुकसान हुआ। तेल और गैस शेयरों में सबसे बड़ी गिरावट आई, जबकि आईटी और फार्मा में कुछ सुधार हुआ।