Top 5 Stock : शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात, दिग्गज ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंट'ने पाच दमदार शेअर्सची निवड केली आहे. पायाभूत सुविधा, बँकिंग, ऑटो आणि ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील हे शेअर्स आगामी काळात गुंतवणूकदारांची चांदी करू शकतात. या कंपन्यांची भक्कम आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विस्तार योजना पाहता, मोठी वाढ अपेक्षित आहे.
१. कमिन्स इंडियाउद्दिष्ट (TP): ५,५०० रुपयेपायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून जनरेटर सेटसाठी मोठी मागणी आहे. विशेषतः डेटा सेंटर्स, हॉटेल्स आणि रुग्णालयांमधून हाय-हॉर्सपॉवर उत्पादनांना मागणी वाढत आहे. कंपनीचे मार्जिन २१ टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज असून, निर्यातीतही चांगली वाढ अपेक्षित आहे.
२. स्टेट बँक ऑफ इंडियाउद्दिष्ट (TP): १,३०० रुपयेदेशातील सर्वात मोठ्या बँकेने गेल्या २० वर्षांतील सर्वात कमी NPA (Gross NPA १.५७%) नोंदवून आपली ताकद सिद्ध केली आहे. बँकेचे ताळेबंद खाजगी बँकांपेक्षाही स्वच्छ दिसत आहेत. कर्जाच्या मागणीत १४-१५% वाढ अपेक्षित असून, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील कॉर्पोरेट कर्जांचा ओघ वाढला आहे.
३. टीव्हीएस मोटरउद्दिष्ट (TP): ४,४६१ रुपयेशहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही बाजारांत टीव्हीएसची पकड मजबूत आहे. कंपनीचा ईव्ही व्यवसाय आता नफ्यात आला आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील निर्यातीमुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. आगामी काळात कंपनीचा नफा २९% दराने वाढण्याचा अंदाज आहे.
४. जैन रिसोर्स रिसायकलिंगउद्दिष्ट (TP): ५२० रुपयेही भारतातील सर्वात मोठी नॉन-फेरस मेटल रिसायकलिंग कंपनी आहे. तांबे आणि शिसे रिसायकलिंगमध्ये कंपनीचा दबदबा असून १२८ देशांतून भंगार आयात करण्याचे त्यांचे जागतिक जाळे आहे. क्षमता विस्तारामुळे आगामी काळात नफ्यात ५६% ची मोठी वाढ अपेक्षित आहे.
५. टाटा पॉवरउद्दिष्ट (TP): ४५५ रुपयेवाढत्या उष्णतेमुळे आणि औद्योगिक मागणीमुळे विजेचा वापर विक्रमी पातळीवर आहे. ओडिशामधील वितरण कंपन्या नफ्यात आल्या असून, मुंद्रा प्रकल्पाबाबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. कंपनीकडे ५.२ GW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प पाइपलाइनमध्ये असून, छतावरील सौर क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे.
| कंपनीचे नाव | ब्रोकरेजचे उद्दिष्ट | मुख्य आकर्षण |
| कमिन्स इंडिया | ५,५०० | डेटा सेंटर आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढ |
| SBI | १,३०० | २० वर्षांतील निच्चांकी NPA |
| टीव्हीएस मोटर | ४,४६१ | ईव्ही आणि निर्यात क्षेत्रातील यश |
| जैन रिसोर्स | ५२० | रिसायकलिंग क्षेत्रातील वाढ |
| टाटा पॉवर | ४५५ | अपारंपरिक ऊर्जा आणि मुंद्रा प्रकल्प |
वाचा - गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Motilal Oswal Wealth Management recommends five robust stocks across infrastructure, banking, auto, and energy sectors. Cummins India, SBI, TVS Motor, Jain Resource Recycling, and Tata Power show strong financial positions and growth prospects, promising good returns for investors.
Web Summary : मोतीलाल ओसवाल वेल्थ मैनेजमेंट ने इंफ्रास्ट्रक्चर, बैंकिंग, ऑटो और ऊर्जा क्षेत्रों में पांच मजबूत स्टॉक की सिफारिश की है। कमिंस इंडिया, एसबीआई, टीवीएस मोटर, जैन रिसोर्स रिसाइक्लिंग और टाटा पावर मजबूत वित्तीय स्थिति और विकास की संभावनाओं को दर्शाते हैं, जो निवेशकों के लिए अच्छा रिटर्न का वादा करते हैं।