Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटा स्टीलसह 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट प्राईस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:28 IST

Top 5 Stock Picks : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार अस्थिर असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण, ह्याच काळात गुंतवणुकीची संधी असते.

Top 5 Stock Picks :शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर, दिग्गज ब्रोकरेज संस्था मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी ५ दर्जेदार कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा स्टील, इंडियन बँक आणि प्रीमिअर एनर्जीज यांसारख्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील मजबूत कामगिरीनंतर या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१. टाटा स्टील - टार्गेट: २४० रुपयेटाटा स्टील सध्या एका निर्णायक टप्प्यावर आहे. भारतातील वाढती मागणी आणि युरोपातील व्यवसायातील सुधारणा यामुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत कंपनीचा ब्रिटनमधील व्यवसाय तोटा विरहित होईल, असा अंदाज आहे. उच्च-मार्जिन असलेल्या ऑटोमोटिव्ह आणि विशेष स्टील क्षेत्रात कंपनी आपला विस्तार करत आहे.

२. मॅक्स फायनान्शिअल - टार्गेट: २२०० रुपयेविमा क्षेत्रातील मॅक्स लाइफची कामगिरी उद्योगाच्या सरासरीपेक्षा अधिक वेगाने होत आहे. कंपनीने ३०% वार्षिक दराने ए.पी.ई वाढ नोंदवली आहे, तर व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसमध्ये ३५% वाढ झाली आहे. संरक्षणात्मक आणि अ‍ॅन्यूइटी सेगमेंटमध्ये कंपनीचे वाढते वर्चस्व भविष्यातील नफ्याची खात्री देते.

३. इंडियन बँक - टार्गेट: १०२५ रुपयेबँकिंग क्षेत्रातून इंडियन बँकेने तिसऱ्या तिमाहीत ३,०६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बँकेच्या कर्जामध्ये १५.४% वार्षिक वाढ झाली आहे. बँकेचा एनपीए सातत्याने कमी होत असून आर्थिक स्थिती अधिक मजबूत होत आहे.

४. प्रीमिअर एनर्जीज - टार्गेट: १००० रुपयेसौर ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी केंद्र सरकारच्या 'ग्रीन एनर्जी' मोहिमेचा मोठा लाभार्थी ठरू शकते. कंपनी आपली सेल आणि मॉड्यूल क्षमता २०२७ पर्यंत दुप्पट करणार आहे. सौर ऊर्जेची देशांतर्गत मागणी आणि नवीन व्हर्टिकल्समुळे कंपनीच्या नफ्यात ३०% चक्रवाढ दराने वाढ अपेक्षित आहे.

५. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी - टार्गेट: १००० रुपयेलक्झरी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात ही कंपनी आपले पाय रोवत आहे. पुणे, बेंगळुरू आणि नवी मुंबईसह मालदीवमधील मालमत्तांमधून कंपनीला मोठा महसूल मिळत आहे. 'सोहो हाऊस' सोबतच्या भागीदारीमुळे कंपनीला सदस्यत्व-आधारित शाश्वत उत्पन्न मिळणार आहे.

कंपनीचे नाव शिफारस नवीन टार्गेट (₹) 
टाटा स्टील खरेदी २४० 
मॅक्स फायनान्शिअल खरेदी २२०० 
इंडियन बँक खरेदी १०२५ 
प्रीमिअर एनर्जीज खरेदी १००० 
व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी खरेदी १००० 

वाचा - आयटी शेअर्समध्ये 'बंपर सेल'! व्हॅल्यूएशन ५ वर्षांच्या निचांकी पातळीवर; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

डिस्क्लेमर : शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील शिफारसी मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने दिलेल्या आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Brokerage Recommends 5 Stocks, Including Tata Steel, for High Returns

Web Summary : Motilal Oswal suggests buying Tata Steel, Max Financial, Indian Bank, Premier Energies, and Ventiv Hospitality. These stocks are expected to yield good returns due to strong performance and growth potential in their respective sectors. Target prices are also provided.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी