Join us

शेअर मार्केटमधून कमाई करायचीय; उत्तम आर्थिक सुबत्तेसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:30 IST

आज मार्केट A 2 Z हे सदर समाप्त होत आहे. गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांसोबत दीर्घ काळ राहावे

पुष्कर कुलकर्णी

शेअर बाजारात संपत्ती बनविता येते. यासाठी आपल्याकडे हवी जिंकण्याची विचारसरणी. कोणतेही युद्ध आधी मनातून जिंकणे आवश्यक असते असे अनुभवी योद्धे सांगतात. तसेच आपल्याला  भविष्यात जर आर्थिक सुबत्ता हवी असेल तर त्याची तयारी आधी आपल्या मनात असणे आवश्यक आहे. मनातील विचार कृतीत उमटतात आणि कृतीतून फलप्राप्ती होत असते. शेअर बाजारात उतरायचे असेल किंवा उतरलेच असाल तर चंचल मनास स्थिर करा. चांगले शेअर निवडून त्यासोबत दीर्घकाळ राहा. भविष्यात तुम्ही निश्चित जिंकलेले असाल. आज शेवटच्या भागात इंग्रजी अक्षर W आणि Z पासून सुरू होणारे दोन चांगले शेअर्स...

विप्रो लि. (WIPRO) आयटी क्षेत्रातील एक जुनी आणि चांगली कंपनी. भारतात आणि इतर अनेक देशांत आयटी सेवा प्रदान करणे हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. कंपनीचा क्लायंट्स बेस उत्तम आहे.फेस व्हॅल्यू : रु. २/- प्रतिशेअरसध्याचा भाव : रु. ४०५.६५/- प्रतिशेअरमार्केट कॅप : रु. २ लाख २५ हजार कोटीभाव पातळी : वार्षिक हाय रु ६१६/- आणि  लो रु ३७२/-बोनस शेअर्स : २००४ ते १९ दरम्यान ५ वेळाशेअर स्प्लिट : दोनवेळा (मूळ फेस व्हॅल्यू रु १००/-)डिव्हिडंड : रु ६/- प्रति शेअररिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तिप्पट रिटर्न्स मिळाले आहेतभविष्यात संधी : चांगली राहीलच आयटी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून, भविष्यात वाढणारे आहे. यामुळे कंपनीचा व्यवसायही वाढेल.

आज मार्केट A 2 Z हे सदर समाप्त होत आहे. गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांसोबत दीर्घ काळ राहावे.  एकसारखे पोर्टफोलियोशी खेळू नये. बाजार जेव्हा अस्थिर असतो तेव्हा मन शांत ठेवावे. बाजार खाली असताना खालच्या भावात उत्तम शेअर पोर्टफोलियोमध्ये जमा करीत राहावे.  यातूनच दीर्घ काळात निश्चितच चांगली संपत्ती बनू  शकते. लोकमतच्या सर्व गुंतवणूकदार वाचकांना मनोमन शुभेच्छा. 

झायडस लाइफ सायन्स लि.  (ZYDUSLIFE)फार्मा सेक्टरमध्ये असलेली ही कंपनी पूर्वी कॅडीला हेल्थ केअर नावाने रजिस्टर होती. लाइफ सायन्स औषधे निर्मिती आणि विविध प्रकारच्या लसींची निर्मिती या कंपनीमार्फत केली जाते. भारतात आणि जगभरात ५५ देशांत कंपनीचा व्यवसाय आहे.फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रति शेअरसध्याचा भाव : रु. ४७३/- प्रति शेअर मार्केट कॅप :  रु. ४७ हजार ९०० कोटी भाव पातळी : वार्षिक हाय रु. ४८२ /- आणि  लो रु. ३१९/- (सध्याचा भाव उच्चतम पातळीवर असल्याने नव्याने एन्ट्रीसाठी थाेडी वाट पाहावी)बोनस शेअर्स : दोन वेळा २००६ आणि २०१० मध्ये.शेअर स्प्लिट : एकदा २०१५ मध्येरिटर्न्स : दहा वर्षांत अडीच पट रिटर्न्स मिळाले.डिव्हिडंड : रु. २.५० पैसे प्रति शेअर मागील वर्षीभविष्यात संधी : फार्मा सेक्टर महत्त्वाचे असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित असे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वेळोवेळी औषधोपचार आवश्यक असतोच. कंपनीचा व्यवसाय भविष्यात चांगला राहू शकतो.

 

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायशेअर बाजार