Join us

रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:15 IST

मार्च तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत ५.१५ टक्के हिस्सा आहे. सोमवारी, ७ जुलै रोजी या ५.१५ टक्के शेअर्सचं मूल्य सुमारे १६,८०० कोटी रुपये होते, ते आता १५,८०० कोटी रुपयांवर आलंय.

Titan Share Price: टाटा समूहाची कंपनी टायटन लिमिटेडच्या शेअरमध्ये आज ८ जुलै रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान शेअरचा भाव ६ टक्क्यांहून अधिक घसरून ३,४३८.३० रुपयांवर आला. या घसरणीमुळे दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे. मार्च तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये ५.१५ टक्के हिस्सा आहे. सोमवारी, ७ जुलै रोजी या ५.१५ टक्के शेअर्सचं मूल्य सुमारे १६,८०० कोटी रुपये होते, ते आता १५,८०० कोटी रुपयांवर आलंय.

दुपारी तीनच्या सुमारास एनएसईवर टायटन लिमिटेडचा शेअर ६.०४ टक्क्यांनी घसरून ३,४४४.७० रुपयांवर व्यवहार करत होता. या घसरणीमुळे कंपनीचं मार्केट कॅप ३.०६ लाख कोटींवर आलं.

टायटनच्या जून तिमाहीतील बिझनेस अपडेटनंतर टायटनच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांची निराशा झाली. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने मंगळवारी आपल्या रिपोर्टमध्ये, जून तिमाहीत कंपनीची स्टँडअलोन रेव्हेन्यू ग्रोथ १८ टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वाढीसाठी ज्वेलरी सेगमेंट कारणीभूत ठरू शकेल असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, ब्रोकरेज कंपनीला कंपनीचे EBIT मार्जिन गेल्या वर्षीच्या तुलनेत २० बेसिस पॉईंट्सनं कमी ११% राहण्याची अपेक्षा आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट (एबिटडा) आणि निव्वळ नफा (पीएटी) अनुक्रमे २०% आणि १९% वाढण्याचा अंदाज आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने टायटनवर आपले 'बाय' रेटिंग कायम ठेवले असून ४,२५० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे. टायटनच्या देशांतर्गत दागिन्यांच्या सेगमेंटमधील विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी ती अपेक्षेपेक्षा २२ टक्क्यांनी कमी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सोन्याच्या किमतीतील अस्थिरता आणि ग्राहक विभागातील घसरणीमुळे हे घडले.

१९ नवी स्टोअर्स सुरू

एप्रिल-जून तिमाहीत टायटननं भारतात १९ नवीन स्टोअर्स सुरू केलेत. ज्यात तनिष्कचे ३, मियाचे ७ आणि कॅरेटलेनच्या ९ स्टोअर्सचा समावेश आहे. घड्याळांच्या सेगमेंटमध्ये, कंपनीने जोरदार अॅनालॉग विक्रीमुळे वार्षिक २३% वाढ नोंदविली. त्याचबरोबर आयवेअर विभागातही वार्षिक १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनं टायटनवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे आणि स्टॉकसाठी ४,२५० रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. कंपनीच्या मते, देशांतर्गत दागिन्यांच्या क्षेत्रात टायटनची विक्री वर्षानुवर्षे १८% वाढली, परंतु ती २२% च्या अपेक्षेपेक्षा कमी होती. सोन्याच्या किमतीतील अस्थिरता आणि ग्राहक विभागातील घसरणीमुळे हे घडलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारटाटा