Multibagger Stock : शेअर बाजारात अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात, पण काही शेअर्स असे असतात, जे थेट तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडतात. 'टायगर लॉजिस्टिक्स (इंडिया) लिमिटेड' हा असाच एक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे, ज्याने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १४००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. ही कंपनी नेमकी काय काम करते? यात गुंतवणुकीची अजूनही संधी आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया.
आता NSE वर एंट्रीया कंपनीसाठी आता आणखी एक मोठी बातमी आहे. टायगर लॉजिस्टिक्सने घोषणा केली आहे की, २८ जून २०२५ रोजी ते राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) मुख्य मंडळावर सूचीबद्ध होणार आहेत. आतापर्यंत हा शेअर फक्त बीएसई (BSE) वर व्यवहार करत होता. या नव्या लिस्टिंगमुळे शेअरमध्ये जास्त खरेदी-विक्री होईल आणि किरकोळ गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करणे अधिक सोपे होईल.
१ लाखाचे झाले १५ लाखया शेअरने गुंतवणूकदारांना किती फायदा दिला, हे एका उदाहरणावरून समजते. जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तेव्हा त्याची किंमत फक्त ३ रुपये होती, ती आज ५० रुपयांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे, तुमच्या १ लाख रुपयांचे मूल्य आज १५ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
कंपनीची मार्केट व्हॅल्यू आणि कामटायगर लॉजिस्टिक्सची सध्याची मार्केट कॅप ६०५.७ कोटी रुपये आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय फ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम क्लिअरन्स आणि सप्लाय चेन सोल्यूशन्ससारख्या सेवा देते, ज्याची मागणी वाढत आहे.
तज्ज्ञांचे मत काय?तज्ज्ञांच्या मते, भारताचा विकास वेगाने होत असल्याने लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान गतिशक्ती योजना' आणि ई-कॉमर्समधील वाढीमुळे या क्षेत्राला मोठी गती मिळत आहे. त्यामुळे, टायगर लॉजिस्टिक्ससारख्या कंपन्यांना भविष्यात मोठी वाढ करण्याची क्षमता आहे.
वाचा - एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)