Join us

₹२२० रुपयांवर जाऊ शकतो हा शेअर; डिफेन्सकडून मिळालं ८०० कोटींचं कंत्राट, एक्सपर्ट म्हणाले, खरेदी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:17 IST

जर तुम्ही शेअर बाजारात क्वालिटी शेअर्स शोधत असाल, तर तुम्ही या शेअरवर लक्ष केंद्रित करू शकता.

जर तुम्ही शेअर बाजारात क्वालिटी शेअर्स शोधत असाल, तर तुम्ही अशोक लेलँडच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करू शकता. अशोक लेलँड कमर्शिअल व्हेईकल्सचं उत्पादन करते. ब्रोकरेज या स्टॉकवर बुलिश असून ते शेअर खरेदीचा सल्ला देत आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीजच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची क्षमता आहे आणि शेअर्सची किंमत २२० रुपयांपर्यंत जाऊ शकते. कंपनीचे शेअर्स सध्या १८२.३० रुपयांवर आहेत.

अशोक लेलँडला नुकतंच संरक्षण मंत्रालयाकडून ८०० कोटी रुपयांचं कंत्राट मिळालंय. या अंतर्गत कंपनीला पुढील १२ महिन्यांमध्ये भारतीय लष्कराला ४*४ फील्ड, आर्टिलरी ट्रॅक्टर आणि ६*६ गन टोईंग वाहनांचा सप्लाय सामाविष्ट आहे.

वाहनांना भारतीय लष्कराच्या आर्टिलरी बटालियनद्वारे वापरासाठी निवडण्यात आलेय. हलक्या आणि मध्यम बंदुकांना सहजरित्या नेता यावं यासाठी यांचा वापर केला जाईल. १९९९ मधील कारगिल युद्धानंतर अशोक लेलँडच्या वाहनांनी भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक चेनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीये.

कंपनीबाबत माहितीअशोक लेलँडचं मुख्य कार्यालय चेन्नईत आहे. ही एक मल्टीनॅशनल वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी हिंदुजा समूहाच्या स्वामित्वाअंतर्गत कार्यरत आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. अशोक लेलँड ऑटो सेक्टरची लार्ज कॅप कंपनी आहे. याची सुरुवात १९४८ मध्ये झाली.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक