Join us

बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावतोय हा रेल्वेचा स्टॉक, वर्षभरात ४००% चा रिटर्नस गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 14:59 IST

आता चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. या काळात अनेक कंपन्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Multibagger Stock: आता चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. या काळात अनेक कंपन्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी बीएसई मिड कॅप निर्देशांकात या आर्थिक वर्षात 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स बद्दल बोलायचं झालं तर एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत त्यात 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

113 कंपन्यांनी पैसे केले दुप्पट 

या आर्थिक वर्षात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. Ace इक्विटी इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, BSE 500 इंडेक्समधील 113 कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. त्याच वेळी, 330 कंपन्यांनी आतापर्यंत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 66 टक्के परतावा दिला आहे. 

'ही' कंपनी रिटर्नच्या बाबतीत अव्वल 

बीएसई 500 निर्देशांकात 20 अशा कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या कंपन्यांच्या यादीत पीएसयी किंवा रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहेत. आयआरएफसी ही सर्वात जास्त परतावा देणारी कंपनी असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 441 टक्क्यांनी वाढली आहे. 28 मार्च रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 142.40 रुपये होती. तर एका वर्षापूर्वी 29 मार्च 2023 रोजी हाच स्टॉक 26.34 रुपयांवर होता. 

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार