Join us

एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:58 IST

Stellant Securities Bonus Share: आज शेअर बाजारात दोन कंपन्या एक्स-बोनस ट्रेडिंग करत आहेत. ही कंपनी एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देत आहे. ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Stellant Securities Bonus Share: आज शेअर बाजारात दोन कंपन्या एक्स-बोनस ट्रेडिंग करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्टेलंट सिक्युरिटीज (Stellant Securities). ही कंपनी एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देत आहे. स्टेलांट सिक्युरिटीज ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

१ वर ४ शेअर्स मिळणार

एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, स्टेलंट सिक्युरिटीजनं म्हटलंय की १ शेअरवर ४ शेअर्स बोनस देण्यात आला आहे. कंपनीनं आजची तारीख बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांचं नाव आज कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळेल. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे.

Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी

गुरुवारी, स्टेलंट सिक्युरिटीजच्या शेअर्सनी अपर सर्किटला धडक दिली. २ टक्क्यांच्या वाढीसह, कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये ७२०.२० रुपयांच्या पातळीवर होते. ट्रेंडिलनच्या आकडेवारीनुसार, गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमती ५१.४% नं वाढल्या आहेत. त्याच वेळी, या शेअरने फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. या काळात, हा शेअर २५० टक्क्यांहून अधिक परतावा देण्यात यशस्वी झालाय.

कंपनीच्या शेअर्सची किंमत ६ महिन्यांत ४७९.९% नं वाढली आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स एका वर्षासाठी ठेवले आहेत त्यांनी आतापर्यंत १७८७.८% नफा कमावलाय.

स्टेट बँकेचाही हिस्सा

ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाचाही या कंपनीत हिस्सा आहे. जून तिमाहीपर्यंत एसबीआयचा १.७ टक्के हिस्सा होता. त्याच वेळी, कंपनीच्या प्रवर्तकांचा ६२.४० टक्के हिस्सा होता. स्टेलंट सिक्युरिटीजमध्ये एकूण सार्वजनिक हिस्सा ३४.९० टक्के आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक