Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजही खुला राहणार शेअर बाजार, 'या' खास कारणामुळे होणार BSE आणि NSE वर आज ट्रेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 08:19 IST

Stock Market Open Today: सामान्यतः शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो, परंतु आज म्हणजेच १४ मार्च रोजी बीएसई आणि एनएसई सुरू राहतील. पाहा काय आहे यामागचं कारण?

Stock Market Open Today: सामान्यतः शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो, परंतु आज म्हणजेच १४ मार्च रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) सुरू राहतील. आज इक्विटी, करन्सी आणि कमोडिटीसह सर्व प्रमुख विभागांमध्ये ट्रेडिंग केली जाईल. परंतु हे सामान्य कामकाजाचं सत्र नसून एक 'मॉक ट्रेडिंग सेशन' (Mock Trading Session) आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही बाजारपेठेची एक तालीम आहे, जिथे खऱ्या पैशांचा व्यवहार होणार नाही, परंतु सिस्टीम अगदी खऱ्या मार्केटप्रमाणे काम करेल.

तांत्रिक पायाभूत सुविधांची चाचणी

या विशेष सत्राचं मुख्य उद्दिष्ट BSE आणि NSE च्या तांत्रिक पायाभूत सुविधांची तपासणी करणं हे आहे. बाजारपेठेत कधीकधी प्रचंड ट्रॅफिक किंवा तांत्रिक बिघाडामुळे ट्रेडिंग थांबण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, सिस्टीम अत्यंत दबावाखालीही सुरळीतपणे काम करते की नाही, याची खात्री ही मॉक ड्रिल करते. आज ही ड्रिल एक्सचेंजच्या प्रायमरी साइटसह 'डिझास्टर रिकव्हरी' (DR) साइटवरही केली जाईल. मुख्य सर्व्हर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत काम करायचं थांबला, तर बॅकअप सिस्टीम त्वरित कामाला लागण्यासाठी तयार आहे का, हे पाहणं हा यामागचा उद्देश आहे.

इंडिगोनं प्रवासाचा विचार करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, आजपासून तिकीट महागणार, कारण काय?

गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करू शकतील का?

आजच्या व्यवहारांचा आपल्या बँक बॅलन्सवर किंवा पोर्टफोलिओवर परिणाम होईल का? असा प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. याचं उत्तर 'नाही' असं आहे. हे केवळ टेस्टिंग आणि ट्रेनिंग सत्र आहे. या कालावधीत केलेल्या कोणत्याही व्यवहाराचा तुमच्या वास्तविक पोर्टफोलिओवर कोणताही परिणाम होणार नाही. यामध्ये खऱ्या पैशांची देवाणघेवाण होणार नाही आणि कोणतेही मार्जिन लागणार नाही. ही सर्व प्रक्रिया 'नॉन-बाइंडिंग' आहे. सिस्टीमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तयार केलेलं हे केवळ एक कृत्रिम वातावरण असेल.

या विभागांमध्ये होणार ट्रेडिंग

या मॉक सेशनमध्ये इक्विटीसह इक्विटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट मध्ये देखील ट्रेडिंग होईल. जे ब्रोकर्स आणि ट्रेडर्स थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम वापरतात, त्यांना त्यांच्या रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम आणि ट्रेडिंग अल्गोरिदमची लाईव्ह मार्केटसारख्या परिस्थितीत चाचणी करण्याची संधी मिळेल. या दरम्यान ब्लॉक डील्स, ट्रेडिंग हॉल्ट आणि रिस्क-रिडक्शन मोड यांसारख्या गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण केल्या जातील, जेणेकरून सिस्टीम 'प्रेशर'मध्ये कशी वागते हे पाहता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Open Today for Mock Trading: Key Details

Web Summary : BSE and NSE are open today, March 14th, for a mock trading session. This tests technical infrastructure, including disaster recovery, across equities, currencies, and commodities. No real money is involved; it's a system test under pressure, ensuring smooth operation during high traffic or technical issues. Transactions won't affect portfolios.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केट