Share Market Opening 19 August, 2025: आज देशांतर्गत शेअर बाजारानं किरकोळ वाढीसह व्यवहार सुरू केले आहेत. मंगळवारी, बीएसई सेन्सेक्स ४५.३६ अंकांच्या (०.०६%) मोठ्या वाढीसह ८१,३१९.११ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, आज एनएसई निफ्टी ५० निर्देशांकानेही १४.४० अंकांच्या (०.०६%) वाढीसह २४,८९१ अंकांवर व्यवहार सुरू केला. सोमवारी, बीएसई सेन्सेक्स ६७६.०९ अंकांच्या (०.८४%) मोठ्या वाढीसह ८१,२७३.७५ अंकांवर बंद झाला आणि निफ्टी ५० निर्देशांक देखील २४५.६५ अंकांच्या (१.००%) मोठ्या वाढीसह २४,८७६.९५ अंकांवर बंद झाला.
आज, सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी फक्त १४ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि उर्वरित १६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० मध्येही ५० कंपन्यांपैकी फक्त २१ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि २८ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. तर आज १ कंपनीचा शेअर कोणताही बदल न होता उघडला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज सर्वाधिक १.८१ टक्के वाढीसह उघडले आणि एचसीएल टेकचे शेअर्स आज सर्वाधिक ०.५५ टक्के घसरणीसह उघडले.
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
मंगळवारी सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये, एनटीपीसीचे शेअर्स १.१३ टक्के, भारती एअरटेल ०.८९ टक्के, अदानी पोर्ट्स ०.७० टक्के, ट्रेंट ०.३२ टक्के, टाटा स्टील ०.१९ टक्के, एसबीआय ०.१५ टक्के, टीसीएस ०.१३ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.१३ टक्के, टायटन ०.११ टक्के, इटर्नल ०.११ टक्के, इन्फोसिस ०.१० टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.०७ टक्के आणि एशियन पेंट्सचे शेअर्स ०.०२ टक्क्यांनी वधारले.
दुसरीकडे, आज महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स ०.५४ टक्के, अॅक्सिस बँक ०.५० टक्के, मारुती सुझुकी ०.४६ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४४ टक्के, बजाज फायनान्स ०.४१ टक्के, सन फार्मा ०.३३ टक्के, पॉवर ग्रिड ०.२८ टक्के, एचडीएफसी बँक ०.२६ टक्के, बीईएल ०.२२ टक्के, आयटीसी ०.२२ टक्के, टाटा मोटर्स ०.२१ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.०६ टक्के, टेक महिंद्रा ०.०५ टक्के आणि एल अँड टीचे शेअर्स ०.०४ टक्के घसरणीसह उघडले.