Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारचा वारू सुसाट, घाेडदाैडीचा नवा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:59 IST

शेअर बाजारात २६ जूनपासून जाेरदार तेजीचे वातावरण आहे

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेअर बाजारातील तेजीला सध्या काेणताही स्पीडब्रेकर राेखताना दिसत नाही. शेअर बाजाराने गुरुवारी माेठी उसळी घेत पुन्हा नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ४७४ तर निफ्टी १५६ अंकांनी वधारले. गेल्या सहा सत्रांमध्ये सेन्सेक्स तब्बल २,१७८ अंकांनी वधारला आहे. तसेच, निफ्टी २० हजार अंकांच्या जवळ पाेहाेचला आहे.

शेअर बाजारात २६ जूनपासून जाेरदार तेजीचे वातावरण आहे. सेन्सेक्स २६ जून राेजी ६२,९७० अंकांवर बंद झाला हाेता. तेव्हापासून सेन्सेक्स ४,६०१ अंकांनी वाढला आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स ६४ हजारांवर पाेहाेचला हाेता. नंतर २० दिवसांत ताे ६७ हजारांवर पाेहाेचला.

तेजी कशामुळे?जुलै महिन्यात बहुतांश कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. अनेक कंपन्यांनी भरघाेस नफा कमावित दमदार कामगिरी नाेंदविली आहे. याशिवाय एकूण कमी झाली महागाई आणि स्थिर व्याजदर, यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 

सेन्सेक्स      ६७,५७१निफ्टी         १९,९७९

टॅग्स :शेअर बाजारमुंबईशेअर बाजार