Share Market: शेअर बाजारातील पडझडीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यातील भीषण घसरणीनंतर, या नवीन आठवड्याची सुरुवातही बाजाराने मोठ्या नुकसानीसह 'लाल निशाणावर' केली आहे. सोमवारच्या सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) ४३०.०२ अंकांच्या (०.५७ टक्के) घसरणीसह ७४,८०७.९७ अंकांवर उघडला. तर दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी ५० (NSE Nifty) निर्देशांक १६१.३० अंकांनी (०.६८ टक्के) कोसळून २३,४८२.२० अंकांवर उघडला.
बाजार कोसळण्याची ३ मुख्य कारणे:
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या या मोठ्या पडझडीमागे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत आहेत:
१. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती: इराण, इस्रायल आणि अमेरिकामधील वाढत्या तणावाचा थेट फटका जागतिक बाजाराला बसत आहे.
२. कच्च्या तेलाच्या किमतीत भडका: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या (Crude Oil) किमती सातत्याने वाढत आहेत.
३. रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य वेगाने घसरत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सेंसेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स 'लाल निशाणावर'
आज बाजार उघडताच बाजारातील चौफेर विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ३ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह 'हिरव्या निशाणावर' उघडले, तर उर्वरित २७ कंपन्यांना मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला.
निफ्टी ५० ची स्थितीही अशीच राहिली. निफ्टीच्या ५० पैकी केवळ ५ शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली, तर तब्बल ४५ शेअर्स घसरणीसह उघडले.
Web Summary : The stock market continues its downward spiral. Sensex fell by 430 points to 74,807.97, and Nifty dropped 161.30 points to 23,482.20. Factors include geopolitical tensions in West Asia, rising crude oil prices, and the rupee's decline against the dollar, creating investor anxiety.
Web Summary : शेयर बाजार में गिरावट का दौर जारी है। सेंसेक्स 430 अंक गिरकर 74,807.97 पर, और निफ्टी 161.30 अंक गिरकर 23,482.20 पर आ गया। पश्चिम एशिया में भू-राजनीतिक तनाव, कच्चे तेल की बढ़ती कीमतें और डॉलर के मुकाबले रुपये में गिरावट जैसे कारकों से निवेशकों में चिंता है।