Join us

शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच, सेन्सेक्स १२३ अंकांच्या घसरणीसह ७५,६१३ वर, निफ्टीही आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:20 IST

Share Market Opening: शेअर बाजारात शुक्रवारी घसरणीसह व्यवहार सुरू झाला आणि निफ्टी ५६ अंकांनी घसरून २२८५७ च्या पातळीवर तर सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून ७५६१३ च्या पातळीवर खुला झाला.

Share Market Opening: शेअर बाजारात शुक्रवारी घसरणीसह व्यवहार सुरू झाला आणि निफ्टी ५६ अंकांनी घसरून २२८५७ च्या पातळीवर तर सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून ७५६१३ च्या पातळीवर खुला झाला. बाजारात सातत्यानं कमकुवतपणा कल दिसून येत आहे, परंतु दुसरीकडे निफ्टीनं अनेकवेळा २२,८०० ची सपोर्ट लेव्हल तोडली नाही. निफ्टीमध्ये सातत्यानं या पातळीवरून खरेदी दिसून आलीये. 

श्रीराम फायनान्स, हिंडाल्को, टाटा स्टील, एल अँड टी, आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस या शेअर्समध्ये निफ्टी ५० च्या टॉप गेनरमध्ये तर महिंद्रा अँड महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्रा टेक सिमेंट, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो हे शेअर्स निफ्टी ५० चे टॉप लूजर ठरले.

निफ्टी गेल्या अनेक ट्रेडिंग सेशन्समध्ये रेंजमध्ये दिसत आहे, २३,००० च्या रेझिस्टन्स लेव्हलवर आहे, जिथून तो वारंवार विक्रीचा दबाव येत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीला २२,८०० च्या खालच्या लेव्हलवर सपोर्ट आहे, जिथून निफ्टीनं अप आणि डाऊन रेंज बनवली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून तो यातच ट्रेडिंग करत आहे. या रेंजमधून बाहेर आल्यावरच निफ्टीमध्ये मोठी हालचाल होईल.

टॅग्स :शेअर बाजार