Join us

दहा हजार कोटी रुपये काढले, पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 05:56 IST

साैदापूर्ती असल्यामुळे येत्या सप्ताहातही बाजार नरमगरम राहण्याची शक्यता आहे. 

प्रसाद गो. जोशी परकीय वित्तसंस्थांनी भारतामधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला असून, गेल्या तीन सप्ताहांमध्ये या संस्थांनी १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. या संस्थांची कामगिरी, जगभरातील बाजारांमधील स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती यावर आगामी सप्ताहात दिशा ठरणार आहे. मात्र, साैदापूर्ती असल्यामुळे येत्या सप्ताहातही बाजार नरमगरम राहण्याची शक्यता आहे. 

परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली विक्री आणि बाजारांमध्ये असलेले मंदीचे वातावरण, यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १८२९.४८ अंशांनी खाली येत ६६,८३८.६३ अंशांवर बंद झाला. 

का काढताहेत पैसे?अमेरिकेत मिळत असलेले जास्त व्याज, मंदीची भीती यामुळे परकीय वित्तसंस्था भारतासह अन्य आशियाई देशांमधून पैसे काढून घेत आहेत.

आठवडा महत्त्वाचाnमार्च ते ऑगस्ट महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी १.७४ लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. nआगामी सप्ताहात फ्यूचर व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजारावर विक्रीचे दडपण असेल. जागतिक बाजारांमधील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमती यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय