Join us

टीसीएसच्या निकालांवर ठरणार बाजाराची चाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:42 IST

- प्रसाद गो. जोशीया सप्ताहामध्ये जाहीर होणारी आर्थिक आकडेवारी आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना घडामोडी या बाजाराला दिशा ...

- प्रसाद गो. जोशीया सप्ताहामध्ये जाहीर होणारी आर्थिक आकडेवारी आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना घडामोडी या बाजाराला दिशा देणाऱ्या ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. 

ऑक्टोबर महिन्याला प्रारंभ झाला असल्याने दुसऱ्या तिमाही निकालांचा सीझन आता लवकरच सुरू होणार आहे. या निकालांमुळे बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळू शकते. याशिवाय या सप्ताहामध्ये जाहीर होणारी पीएमआयची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे टीसीएसचे तिमाही निकालही जाहीर होणार आहेत. त्याकडेही बाजाराचे लक्ष असणार आहे. खनिज तेलाच्या दरावरही लक्ष देण्याची गरज आहे. 

कोण फायद्यात, कोण तोट्यात?

गेल्या आठवड्यात देशातील प्रमुख १० सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण ७४,५७३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात एचडीएफसी बँकला सर्वाधिक फायदा झाला. 

एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य ३०,१०६ कोटींनी वाढून १४.८१ लाख कोटी झाले आहे. एलआयसीचे मूल्य २०,५८७ कोटींनी वाढून ५.७२ लाख कोटी झाले आहे. रिलायन्सचे मूल्य १९,३५१ कोटींनी घटून १८.४५ लाख कोटी झाले.

सलग तिसऱ्या महिन्यामध्ये विक्रीचा मारा का सुरू?

परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून सलग तिसऱ्या महिन्यामध्ये सुमारे २४ हजार कोटी रुपये काढून घेतले. त्यांनी सप्टेंबर महिन्यात २३,८८५ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

 याआधी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये या वित्तसंस्थांनी अनुक्रमे १७,७०० कोटी आणि ३४,९९० कोटी रुपये काढून घेतले आहेत.

त्यामुळे या वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून १.५८ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. आगामी काळात या संस्थांचा मूड कसा राहणार यावर बाजार वर की खाली जाणार ते ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Results to Steer Market; Foreign Investors Pull Out Funds

Web Summary : TCS's quarterly results and economic data will influence the market. Foreign investors continue to withdraw funds, impacting market direction. HDFC Bank saw market cap increase. Focus on oil prices is crucial.
टॅग्स :शेअर बाजार