Stock Market Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सोमवारी निफ्टी सुमारे अर्धा टक्का वाढीसह बंद झाला, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक मात्र सपाट राहिले. निफ्टी बँकही जवळपास सपाट पातळीवर बंद झाला. सेक्टरल आघाडीवर पाहिले असता, आयटी शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली आणि निफ्टी आयटी निर्देशांक २.४% वाढीसह बंद झाला. यासोबतच रिअल्टी, मेटल आणि फार्मा निर्देशांकांमध्येही तेजी राहिली. याउलट, पीएसयू बँक, एनर्जी आणि पीएसई शेअर्समध्ये दबाव पाहायला मिळाला.
बाजारतील एकूण ५ शेअर्समध्ये तेजीच्या तुलनेत ४ शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. निफ्टीसाठी आजही २५,००० चा स्तर 'रेझिस्टन्स झोन' राहिला.
या पातळीवर बंद झाला बाजार
- सोमवारी दिवसभर कामकाज झाल्यानंतर निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह २४,९६८ च्या पातळीवर बंद झाला.
- सेन्सेक्स ३२९ अंकांच्या तेजीसह ८१,६३६ च्या पातळीवर स्थिरावला.
- निफ्टी बँक १० अंकांच्या किरकोळ घसरणीसह ५५,१३९ च्या पातळीवर बंद झाला.
- निफ्टी मिडकॅप निर्देशांक ७२ अंकांनी वाढून ५७,७०२ च्या पातळीवर बंद झाला.
या शेअर्समध्ये दिसली मोठी हालचालसकारात्मक ब्रोकरेज रिपोर्टमुळे टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो यांसारखे आयटी शेअर्स निफ्टीचे टॉप गेनर्स ठरले. निफ्टीमधून बाहेर काढले गेल्यानंतरही हिरो मोटोकॉर्प आणि इंडसइंड बँक १ ते २ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. जीएसटी दरांच्या बदलामुळे उपभोग संबंधित शेअर्समध्ये तेजी दिसली. दुसरीकडे, कॅपिटल मार्केटशी संबंधित शेअर्सवर दबाव दिसून आला, ज्यात बीएसई आणि एंजल वन २-३% घसरणीसह बंद झाले.
वाचा - ५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
व्होडाफोन आयडियामध्येही शुक्रवारी सुरू झालेली तेजी सोमवारीही कायम राहिली आणि हा स्टॉक ५% वाढीसह बंद झाला. आयआरबी इन्फ्रा आणि जिंदाल स्टेनलेसचे शेअर्सही ३% वाढले. सरकारने आयातीशी संबंधित नियम कडक केल्याने टीएनपीएल, मालू पेपर, वेस्ट कोस्ट पेपर आणि जेके पेपर यांसारख्या पेपर स्टॉक्समध्ये १० ते १७% ची मोठी वाढ दिसून आली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)