Join us

Tata steel share price: ₹१९५ पर्यंत जाणार TATA चा हा शेअर! तिमाही निकालानंतर पकडला रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:37 IST

Tata steel share price: टाटांच्या कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. कामकाजाच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वधारून १६७.१५ रुपयांवर बंद झाला. पाहा कोणता आहे हा शेअर?

Tata steel share price: टाटा स्टीलच्या शेअरमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. कामकाजाच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वधारून १६७.१५ रुपयांवर बंद झाला. २७ मे २०२४ रोजी हा शेअर १७८ रुपयांच्या पातळीवर गेला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. १ जून २०२३ रोजी हा शेअर १०५.८० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. 

शेअरची टार्गेट प्राईज 

ब्रोकरेज कंपनी जेएम फायनान्शियलनं टाटा स्टीलचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर १८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज ब्रोकरेजनं व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे ब्रोकरेज कंपनी जेफरीजने टाटा स्टीलच्या शेअरसाठी १९५ रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे. 

मार्च तिमाहीचे निकाल कसे होते? 

मार्च २०२४ तिमाहीत टाटा स्टीलचा नफा ६४.५९ टक्क्यांनी घसरून ५५४.५६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,५६६.२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ६३,१३१.०८ कोटी रुपयांवरून कमी होऊन ५८,८६३.२२ कोटी रुपयांवर आलं. खर्च ५६,४९६.८८ कोटी रुपये झालं आहे, जे गेल्या वर्षात ५९,९१८.१५ कोटी रुपये होता. टाटा स्टीलच्या संचालक मंडळानं २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ३.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सध्या टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील व्यवसायाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार