Join us

टाटा सन्सचा IPO कधी येणार? समोर आली मोठी महिती, टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:51 IST

Tata Sons IPO Update: सोमवारच्या सत्रात टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

Tata Sons IPO: शेअर बारातील गुंतवणूकदार अनेक दिवसांपासून टाटा सन्सच्या (Tata Sons) IPO ची वाट पाहत आहेत. आता हा आयपीओ येण्याची शक्यता बळावली आहे. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने( RBI) टाटा सन्सला स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यापासून सूट देण्याची टाटा समूहाची विनंती नाकारली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

सोमवार(21 ऑक्टोबर, 2024) रोजी व्यापार सत्रात सर्वात मोठी वाढ टाटा समूहाच्या टाटा केमिकल्स शेअरमध्ये दिसून आली. दिवसाच्या व्यापारात हे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद होताना टाटा केमिकल्सचा शेअर 8.73 टक्क्यांच्या उसळीसह 1183 रुपयांवर बंद झाला. टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक वाढले. पण बंद होईपर्यंत हा शेअर 3.60 टक्क्यांनी वाढून 7059.80 रुपयांवर बंद झाला. याशिवाय तेजस नेटवर्क 11.04 टक्क्यांच्या वाढीसह आणि टाटा कॉफी 3.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

आरबीआयच्या या निर्णयानंतर टाटा समूहाला टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करावे लागणार आहे. आरबीआयने टाटा सन्सचे अप्पर लेयर एनबीएफसी म्हणून वर्गीकरण केले आहे. अशा सर्व कंपन्या ज्यांना RBI वरच्या स्तरावरील NBFCs मानते, त्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करावे लागेल. दरम्यान, टाटा सन्सचे मूल्य सुमारे 11 लाख कोटी रुपये आहे. कंपनीने IPO मधील 5 टक्के स्टेकदेखील विकला, तर IPO चा आकार रु. 55,000 कोटी असू शकतो. हा Hyundai Motor India च्या 27,870 कोटी रुपयांच्या आयपीओ पेक्षाच्या मोठा असेल.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक