Join us

Tata च्या शेअर्सनी केले मालामाल; अवघ्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले रु. 85000 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 13:56 IST

समूहातील Tata Chemicals ने अवघ्या चार दिवसात 36% परतावा दिला.

Tata Shares News: देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेला Tata Group लवकरच आणखी एक IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बातमी मार्केटमध्ये येताच ग्रुपच्या बहुतांशी शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात Tata Chemicalsच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर, उर्वरित शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून आली, ज्यामुळे टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 85,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी गेल्या 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये 36% परतावा दिला आहे. तर Tata Investment कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 28%, टाटा ग्रुपच्या रॅलिस इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 14 %, टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये 13% आणि टाटा मोटर्सच्या स्टॉक्समध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टाटा आणखी एक IPO लॉन्च करणारगेल्या वर्षी दोन दशकांनंतर टाटा ग्रुपने टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ लॉन्च केला, ज्याला गुंतवणूकदारांचाही खुप चांगला प्रतिसाद मिळाला. लिस्टिंगच्या दिवशीच या IPO ने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. आता पुन्हा एकदा टाटा ग्रुपची कंपनी Tata Sons आपला IPO लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, टाटा सन्सचा IPO लवकरच येऊ शकतो. 

टाटा सन्समध्ये या कंपन्यांचे शेअरहोल्डिंगटाटा सन्सचे मूल्यांकन अंदाजे 11 लाख कोटी रुपये आहे. आता टाटा सन्सचा IPO आला तर त्याची इश्यू साईझ 50 हजार कोटी रुपये असू शकतो. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि इंडिया हॉटेल्स यांची टाटा सन्समध्ये हिस्सेदारी आहे. यामुळे टाटा सन्सच्या लिस्टिंगच्या बातम्यांमुळे शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे.

(टीप-शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :टाटाव्यवसायगुंतवणूकशेअर बाजारशेअर बाजार