Join us

₹४७४ वर जाणार TATAचा 'हा' शेअर, एक्सपर्ट्सची नजर; ८ मे चा दिवस महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 15:19 IST

Tata Power Share ₹४७४ वर जाणार, गेल्या एका वर्षात या शेअरनं गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

Tata Power share: उन्हाळ्याच्या हंगामात पॉवर सेक्टर शेअर्सवर विशेष लक्ष असतं. टाटा पॉवर देखील यापैकी एक शेअर आहे. टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे ​​शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी सुस्त दिसत आहे. असं असलं तरी गेल्या एका वर्षात या शेअरनं गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. 

काय आहे शेअरची किंमत? 

कामकाजादरम्यान, टाटा पॉवरचे शेअर्स शुक्रवारी 2.52 टक्क्यांनी घसरून 419.05 रुपयांवर आली. 12 एप्रिल रोजी शेअरचा भाव 444.10 रुपयांवर आला होता. हा देखील या शेअरचा  52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात 120 टक्क्यांनी वाढला आहे. 

8 मे हा महत्त्वाचा दिवस आहे 

8 मे 2024 हा टाटा समूहाच्या वीज कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान, या दिवशी कंपनी चौथ्या तिमाहीचे (Q4 FY24) निकाल जाहीर करेल. यासोबतच कंपनी आपल्या भागधारकांसाठी डिविडंड जाहीर करण्याच्याही विचारात आहे. 

काय म्हणला तज्ज्ञ? 

टाटा पॉवरची मजबूत कमाई सुरू राहण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया विल्यम ओ'नील इंडियाचे इक्विटी संशोधन प्रमुख मयुरेश जोशी यांनी बिझनेस टुडे टीव्हीला सांगितलं. दरम्यान, या स्टॉकनं 444 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठलाय. या शेअरचं नजीकचं टार्गेट 454-474 रुपये असेल, अशी प्रतिक्रिया प्रभुदास लीलाधरचे शिजू कूथुपालक्कल यांनी दिली. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार