Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच्या 'या' कंपनीला इंडोनेशियातून ७० हजार वाहनांची ऑर्डर; शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:26 IST

Tata Motors Shares: बाजारातील चढ-उतारांच्या वातावरणात टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी मागणी दिसून आली. या शेअरनं नवा उच्चांक गाठलाय. तुमच्याकडे आहे का हा शेअर.

Tata Motors Shares: बाजारातील चढ-उतारांच्या वातावरणात टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअर्सना बुधवारी मोठी मागणी दिसून आली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी टाटा मोटर्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वाढून ४९७.८० रुपये या ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला. या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३०६ रुपये आहे. टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमधील ही तेजी परदेशातून मिळालेल्या एका मोठ्या ऑर्डरमुळे आली आहे.

इंडोनेशियासोबत ७०,००० वाहनांचा मोठा करार

टाटा मोटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी 'पीटी टाटा मोटर्स डिस्ट्रीब्युशन इंडोनेशिया'नं इंडोनेशियामध्ये ७०,००० वाहनांच्या पुरवठ्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या उपकंपनीसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे. ही वाहनं प्रामुख्याने कृषी उपक्रम आणि ग्रामीण लॉजिस्टिकमध्ये वापरली जाणार असून, यामध्ये शेतमालाची बाजारपेठेपर्यंतची वाहतूक आणि देशभरातील मालवाहतुकीचा समावेश असेल. या करारांतर्गत टाटा मोटर्स आपल्या उपकंपनीला ३५,००० 'योद्धा' (पिकअप) आणि ३५,००० 'अल्ट्रा टी.७' (ट्रक) अशा एकूण ७०,००० युनिट्सचा पुरवठा करणार आहे. ही वाहने इंडोनेशियाची सरकारी कंपनी 'पीटी ॲग्रीनास पंगन नुसंतारा'ला दिली जातील.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, ऑल टाईम हायपेक्षा २०००० रुपये स्वस्त मिळतंय Gold; पाहा लेटेस्ट दर

ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला बळ

टाटा मोटर्सने इंडोनेशियातील ही वाहन पुरवठा सेवा त्या देशातील 'कोपरासी देसा' आणि 'केलुरहान मेराह पुतिह' या दोन मोठ्या धोरणात्मक प्रकल्पांशी जोडली आहे. हे ट्रक आणि पिक-अप वाहनं इंडोनेशियाच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना बळकटी देतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. पीटी टाटा मोटर्स डिस्ट्रीब्युसी इंडोनेशियाचे संचालक आसिफ शमीम यांनी सांगितलं की, ही ऑर्डर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय व्यावसायिक वाहनांची वाढती स्वीकारार्हता आणि ग्राहकांचा विश्वास दर्शवते.

कंपनीचं शेअरहोल्डिंग पॅटर्न

टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार केल्यास, प्रवर्तकांकडे ४२.५६ टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे ५७.४४ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये मुख्यत्वे 'टाटा सन्स'चा समावेश असून त्यांच्याकडे १,४७,८२,६३,५४१ शेअर्स म्हणजेच ४०.१४ टक्के इतकी मोठी भागीदारी आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Motors' Shares Soar on Massive Indonesian Vehicle Order

Web Summary : Tata Motors shares surged after its subsidiary secured a 70,000 vehicle order from Indonesia. The deal involves supplying 'Yodha' pickups and 'Ultra T.7' trucks to support agriculture and rural logistics, boosting connectivity and economic development. Shares hit a 52-week high.
टॅग्स :टाटाइंडोनेशिया