Join us

स्टॉक मार्केटमध्ये ‘भूकंप’, दिग्गजांना मोठा फटका; Tata च्या 6 कंपन्यांचे ₹1.28 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:23 IST

Tata Group Stock: आज शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे.

Tata Group Stock: आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला आहे. शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण आज पाहायला मिळाली. सेन्सेक्स 2,226.79 अन् निफ्टी 742.85 अंकानी कोसळले. या भूकंपात Tata सारख्या बड्या कंपन्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. निफ्टी 50 निर्देशांकात सूचीबद्ध असलेल्या टाटा समूहाच्या सहा कंपन्यांनी 1.28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल गमावले आहे. या सर्व 6 कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीचे कारण म्हणजे ट्रम्प यांची टॅरिफ घोषणा.

त्या 6 कंपन्या कोणत्या?निफ्टी 50 निर्देशांकात टाटा समूहाच्या सहा कंपन्या TCS, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, टाटा ग्राहक उत्पादने आणि ट्रेंट आहेत. आजच्या घसरणीत टाटा समूहाच्या या कंपन्यांचे मार्केट कॅप 1.28 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

ट्रेंटमध्ये सर्वात मोठी घसरणसर्वात मोठी घसरण कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या ट्रेंट या कंपनीच्या शेअर्समध्ये झाली आहे. कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले. मार्च 2020 नंतर एका दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. 

टाटा स्टील ते टाटा मोटर्सला फटकादुसरी मोठी घसरण टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये झाली. टाटा स्टीलच्या शेअरच्या किमतीत घसरण झालेला हा दुसरा दिवस आहे. TCS शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीचे शेअर्स NSE मध्ये 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 3,056.05 अंकांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. टायटन आणि टाटा कंझ्युमरच्या शेअरच्या किमती अनुक्रमे 5 टक्के आणि 6 टक्क्यांनी घसरल्या आहेत. या यादीत टाटा मोटर्स ही सहावी कंपनी आहे.

(टीप- शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक