Join us

टाटाचा 'हा' शेअर गडगडला; 6 महिन्यांत 65% पेक्षा जास्त घसरला, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:36 IST

Tata Group Share : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. याचा फटका अनेक कंपन्यांना बसला आहे.

Tata Group Share : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. याचा फटका अनेक कंपन्यांना बसला आहे. टाटा मोटर्स प्रमोटेड कंपनी ऑटोमोबाईल कॉर्प ऑफ गोव्याच्या शेअर्समध्येही सोमवारी मोठी घसरण झाली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले अन् 990.75 रुपयांवर बंद झाले. विशेष म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 65% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. हा शेअर 2903.40 रुपयांवरुन 990.75 रुपयांपर्यंत घसरला आहे.

ऑटोमोबाइल कॉर्प ऑफ गोव्याचे शेअर्स त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्च पातळीपासून 70 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. 2 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 3449 रुपयांवर होते. तर, 3 मार्च 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 990.75 रुपयांवर बंद झाले. आपण गेल्या एका वर्षाबद्दल बोललो, तर शेअर्समध्ये 43% ची घसरण झाली आहे. याशिवाय, गेल्या 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 55% घसरण झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 53% घसरले आहेत.

5 वर्षात 143% वाढले दरम्यान, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवाच्या शेअर्समध्ये गेल्या 5 वर्षांत 143% पेक्षा जास्त वाढही झाली आहे. 6 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 406.55 रुपयांवर होते, तर 3 मार्च 2025 रोजी शेअर्स 990.75 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच, गेल्या 4 वर्षात शेअर्समध्ये 118% वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सचा कंपनीत 48.98% हिस्सा या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 49.77% आहे. प्रमोटर्स टाटा मोटर्स लिमिटेडचा कंपनीत 48.98 टक्के हिस्सा आहे, तर टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचा 0.79 टक्के हिस्सा आहे. हा शेअरहोल्डिंग डेटा डिसेंबर 2024 तिमाहीपर्यंतचा आहे.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक