Tata Capital IPO : तुम्ही जर आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी शोधत असाल तर ती संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) असलेली टाटा कॅपिटल आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. हा आयपीओ २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरपर्यंत टाटा कॅपिटल शेअर बाजारात लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, या इश्यूमुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन ११ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जर हे झाले तर देशाच्या फायनान्शियल सेक्टरमधील हा सर्वात मोठा पब्लिक इश्यू ठरू शकतो.
आयपीओमध्ये ४७.५८ कोटी शेअर्सऑगस्टमध्ये दाखल केलेल्या अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नुसार, या आयपीओमध्ये एकूण ४७.५८ कोटी शेअर्स जारी केले जातील. यामध्ये २१ कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स असतील, तर २६.५८ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत सध्याच्या गुंतवणूकदारांकडून विकले जातील.
या ओएफएस (OFS) मध्ये टाटा सन्स २३ कोटी शेअर्स विकणार आहे, तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ३.५८ कोटी शेअर्स विकेल. सध्या टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सची ८८.६ टक्के हिस्सेदारी आहे, तर आयएफसीकडे १.८ टक्के हिस्सेदारी आहे.
आयपीओ का आणत आहे?आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे टाटा कॅपिटलसाठी शेअर बाजारात लिस्ट होणे आवश्यक झाले आहे. २०१२ मध्ये आरबीआयने टाटा कॅपिटलला 'अप्पर लेअर एनबीएफसी' म्हणून वर्गीकृत केले होते. या श्रेणीतील कंपन्यांना तीन वर्षांच्या आत शेअर बाजारात लिस्ट होणे अनिवार्य आहे. आता याच नियमानुसार टाटा कॅपिटलची लिस्टिंग केली जात आहे. या आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनीच्या टीयर-१ भांडवलाला बळकटी देण्यासाठी आणि भविष्यातील गरजा, जसे की कर्ज देण्यासाठी केला जाईल.
कंपनीची आर्थिक स्थितीचालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १,०४१ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे, कंपनीचे एकूण उत्पन्न ६,५५७ कोटी रुपयांवरून ७,६९२ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. २००७ मध्ये स्थापन झालेल्या टाटा कॅपिटलने आतापर्यंत ७० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. ही कंपनी विमा, क्रेडिट कार्ड, प्रायव्हेट इक्विटी फंड आणि वेल्थ सर्व्हिसेस देखील पुरवते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)