Join us

टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:58 IST

Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा आयपीओ लाँच होण्यास सज्ज असून गुंतवणूकदारांना ६ ऑक्टोबरपासून गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Tata Capital IPO : तुम्ही जर आयपीओच्या माध्यमातून पैसा कमावण्याची संधी शोधत असाल तर ती वेळ आता आली आहे. देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यवसाय समूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपचा आणखी एक आयपीओ शेअर बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. टाटा समूहाची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या टाटा कॅपिटलचा आयपीओ सामान्य गुंतवणूकदारांसाठी सोमवार, ६ ऑक्टोबरपासून खुला होणार आहे.

शुक्रवारी (४ ऑक्टोबर) हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या मोठ्या आयपीओचे प्राइस बँड, लॉट साईज आणि लिस्टिंगची तारीख निश्चित झाली आहे.

बोली कधी आणि किती दिवसांसाठी?किरकोळ गुंतवणूकदार ६ ऑक्टोबर (सोमवार) पासून ८ ऑक्टोबरपर्यंत (बुधवार) या आयपीओसाठी बोली लावू शकतील.टाटा कॅपिटल IPO च्या महत्त्वाच्या तारखा

बोली सुरू होण्याची तारीख ६ ऑक्टोबर (सोमवार) 
बोलीची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर (बुधवार)
ॲलॉटमेंटची प्रक्रिया ९ ऑक्टोबर 
शेअर लिस्टिंगची तारीख १३ ऑक्टोबर (BSE आणि NSE वर) 

आयपीओचा आकार: टाटा कॅपिटल या इश्यूमधून एकूण १५,५११.८७ कोटी रुपये उभे करणार आहे. यात ६,८५६ कोटींचे फ्रेश शेअर्स (नवीन समभाग) आणि ८,६६५.८७ कोटींचे ऑफर फॉर सेल शेअर्सचा समावेश आहे.

प्राइस बँड, लॉट साईज आणि किमान गुंतवणूकतुम्ही जर या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहेप्राइस बँड (किंमत पट्टा): ₹३१० ते ₹३२६ प्रति शेअर (फेस व्हॅल्यू ₹१०)लॉट साईज: ४६ शेअर्सकिमान गुंतवणूक: अप्पर प्राइस बँडनुसार, एका लॉटसाठी किमान १४,९९६ रुपये गुंतवावे लागतील.कमाल गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉट (५९८ शेअर्स) साठी बोली लावू शकतात, ज्यासाठी सुमारे १,९४,९४८ रुपये गुंतवावे लागतील.

GMP ने वाढवली उत्सुकता, लवकरच होईल लिस्टिंगहा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होण्यापूर्वीच, ग्रे-मार्केटमध्ये याची चांगलीच चर्चा आहे. ३ ऑक्टोबर रोजी या आयपीओचा GMP २० रुपये प्रीमियमवर ट्रेड करत होता. या अंदाजानुसार, टाटा कॅपिटलची शेअर बाजारात ३४६ रुपये (₹३२६ + ₹२०) च्या आसपास लिस्टिंग होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग नफा होण्याची अपेक्षा आहे.

देशातील चौथा सर्वात मोठा IPOटाटा कॅपिटलचा हा आयपीओ भारतीय आयपीओ बाजारातील आतापर्यंतचा चौथा सर्वात मोठा इश्यू असणार आहे. यापूर्वी, हुंडई मोटर इंडिया (₹२७,८५० कोटी), एलआयसी (₹२०,५५० कोटी) आणि पेटीएम (₹१८,३०० कोटी) या कंपन्यांचे इश्यू मोठे होते.

वाचा - IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

कंपनीची आर्थिक स्थिती: टाटा कॅपिटलची आर्थिक स्थिती मजबूत आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY26) कंपनीने १,०४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीतील नफ्यापेक्षा (४७२ कोटी रुपये) दुप्पट आहे. कंपनीचे एकूण उत्पन्नही वाढून ७,६९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Capital IPO opens soon: A chance to invest.

Web Summary : Tata Capital's IPO opens October 6th, offering investors a chance to buy shares. The price band is ₹310-₹326 per share, with listing expected on October 13th. The IPO aims to raise ₹15,511.87 crore, and GMP indicates potential listing gains.
टॅग्स :टाटाशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक