Join us

Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:33 IST

Tata Capital IPO Open Today: शुक्रवारी, टाटाचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला, ज्यामध्ये १४,२३,८७,२८४ शेअर्स ऑफर केले गेले, ज्यांचे एकूण मूल्य ₹४६४१.८३ कोटी आहे. गुंतवणूकदार यात कसे गुंतवणूक करू शकतात ते जाणून घेऊया.

Tata Capital IPO:टाटा कॅपिटलचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झालाय. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपचा हा आयपीओ १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा आहे. गुंतवणूकदार तीन दिवसांमध्ये यासाठी बोली लावू शकतील. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी, टाटाचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला, ज्यामध्ये १४,२३,८७,२८४ शेअर्स ऑफर केले गेले, ज्यांचे एकूण मूल्य ₹४६४१.८३ कोटी आहे. गुंतवणूकदार यात कसे गुंतवणूक करू शकतात ते जाणून घेऊया.

८ ऑक्टोबरपर्यंत करू शकता गुंतवणूक

टाटा कॅपिटलचा आयपीओ सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला असून तो ८ ऑक्टोबरपर्यंत खुला राहील. याचा अर्थ गुंतवणूकदार तीन दिवस बोली लावू शकतील. टाटा कंपनी आयपीओ अंतर्गत ४७,५८,२४,२८० शेअर्ससाठी बोली मागवत आहे. यामध्ये २१,००,००,००० नवीन शेअर्सचा समावेश आहे, ज्यांचं मूल्य ₹६,८५६ कोटी आहे, तर २६,५८,२४,२८० शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (ओएफएस) विकले जात आहेत, ज्याचं मूल्य ₹८६६५.८७ कोटी आहे. यामुळे टाटा कॅपिटलच्या आयपीओची साईज १५,५११.८७ कोटी झाली आहे.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

किती आहे प्राईज बँड?

टाटा कॅपिटलच्या आयपीओच्या प्राईज बँडबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने तो ₹३१०-₹३२६ प्रति शेअर असा निश्चित केला आहे. टाटाचा आयपीओ या वर्षी आतापर्यंत लाँच झालेला सर्वात मोठा इश्यू असेल. एचडीबी फायनान्शियलचा जूनमध्ये मागील आयपीओ ₹१२,५०० कोटींचा होता, परंतु टाटा कॅपिटलच्या ₹१५,५११.८७ कोटींच्या इश्यू साईजनं त्याला मागे टाकलं आहे. आयपीओसाठी अलॉटमेंट प्रक्रिया ९ ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि शेअर बाजारात हा आयपीओ १३ ऑक्टोबर रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.

किती करावी लागेल गुंतवणूक?

आता गुंतवणूकदार १५,००० पेक्षा कमी किमतीच्या टाटा कॅपिटलमध्ये भागीदार कसे बनू शकतात आणि त्यांच्या नफ्यात वाटा कसा मिळवू शकतात हे पाहू. कंपनीनं त्यांच्या आयपीओसाठी ४६ शेअर्सचा लॉट साईज निश्चित केला आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही गुंतवणूकदाराला कमीत कमी तेवढ्या शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. अपर प्राईज बँडमध्ये पाहिल्यास यासाठी किमान १४,९९६ रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त १३ लॉटसाठी बोली लावता येणार आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Capital IPO Opens: Invest ₹14,996, Become a Profit Partner!

Web Summary : Tata Capital's IPO, worth over ₹15,000 crore, is now open for investment until October 8th. The IPO price band is ₹310-₹326 per share. Investors can participate with a minimum investment of ₹14,996 for 46 shares.
टॅग्स :टाटाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार