Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stock Markets Today: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; Sensex ४०० अंकांनी वधारला, बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:02 IST

Stock Markets Today: भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापारी करार अंतिम झाल्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय दमदार झाली. सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांनी, तर निफ्टी १४० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

Stock Markets Today: भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापारी करार (Interim Trade Deal) अंतिम झाल्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय दमदार झाली. सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांनी, तर निफ्टी १४० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक ‘किंग ऑफ ऑल डील्स’ (King of All Deals) मुळे जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

बाजार उघडताच निर्देशांकांची स्थिती

सकाळी ०९:३२ वाजता सेन्सेक्स ४१७ अंकांच्या तेजीसह ८३,५०० च्या जवळ होता. निफ्टीमध्ये १२० अंकांची वाढ होऊन तो २५,८१५ च्या आसपास पोहोचला. तर बँक निफ्टी ५५५ अंकांच्या वाढीसह ६०,६७५ वर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे, मागील क्लोजिंगच्या तुलनेत सेन्सेक्स ५९७ अंकांनी वधारून ८४,१७७ वर, तर निफ्टी १९५ अंकांनी वधारून २५,८८८ वर उघडला.

झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

सेक्टोरल इंडेक्स आणि शेअर्सची हालचाल

पीएसयू बँक इंडेक्समध्ये (PSU Bank Index) सुमारे ३% ची वाढ दिसून आली. मेटल आणि आयटी शेअर्समध्येही तेजी होती. निफ्टी ५० वर SBI, Titan, Adani Enterprise, Tata Steel, Eternal, Dr Reddy, आणि Hindalco या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी होती. तर एफएमसीजी इंडेक्स वगळता इतर सर्व सेक्टोरल इंडेक्स ग्रीन झोनमध्ये होते. Eicher Motors, Max Healthcare, Bajaj Finance, HUL, Nestle, Infosys, आणि ONGC या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

याशिवाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही १ टक्क्याची वाढ पाहायला मिळाली. रुपया ८ पैशांनी मजबूत होऊन ९०.५८/$ वर उघडला.

'किंग ऑफ ऑल डील्स' चा मोठा दिलासा

भारत-अमेरिका दरम्यान झालेल्या या करारांतर्गत भारतीय उत्पादनांवरील 'रेसिप्रोकल टॅरिफ' ५०% वरून थेट १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. अनेक उत्पादनांवरील एक्सपोर्ट ड्युटी आता शून्य झाली आहे. या करारामुळे भारताला अमेरिकेच्या सुमारे ३० ट्रिलियन डॉलरच्या बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे. त्या बदल्यात भारत पुढील ५ वर्षांत अमेरिकेकडून सुमारे ५०० अब्ज डॉलरच्या वस्तू खरेदी करणारे.

रशियन तेलावरील टॅरिफ हटवल्याचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावलेला अतिरिक्त २५% टॅरिफ देखील हटवला आहे. यामुळे ऊर्जा बाजारपेठेत मोठा दिलासा मिळाला असून, याचा सकारात्मक परिणाम गिफ्ट निफ्टीवर आणि भारतीय बाजारावर दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक