Join us

Stock Markets Today: जानेवारी सीरिजची तेजीसह सुरुवात, Nifty ८० अंकांनी वधारला; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:55 IST

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी (२७ डिसेंबर) निफ्टीच्या जानेवारी सीरिजला सुरुवात झाली आणि यानिमित्तानं बाजार तेजीनं उघडला.

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी (२७ डिसेंबर) निफ्टीच्या जानेवारी सीरिजला सुरुवात झाली आणि यानिमित्तानं बाजार तेजीनं उघडला. सेन्सेक्स १३५ अंकांनी वधारून ७८,६०७ वर उघडला. तर निफ्टी ५१ अंकांनी वधारून २३,८०१ वर तर बँक निफ्टी १९८ अंकांनी वधारून ५१,२६८ वर उघडला. तर, करन्सी मार्केटमध्ये रुपया ५ पैशांनी घसरून ८५.३४/डॉलरच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.

त्यानंतर सेन्सेक्स ३०० अंकांनी, निफ्टी ८० अंकांनी आणि बँक निफ्टी २०० अंकांनी वधारुन व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅप निर्देशांकही जवळपास २०० अंकांनी वधारला. एनएसईवर ऑटो निर्देशांक, एनबीएफसी, बँका आणि आयटी निर्देशांक वधारले. त्याचवेळी हेल्थकेअर इंडेक्समध्ये किंचित घसरण दिसून आली.

बजाज ऑटो, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक वधारले. तर अपोलो हॉस्पिटल, डॉ. रेड्डी, ब्रिटानिया, टायटन, एचसीएल टेकमध्ये घसरण झाली.

जागतिक बाजाराचे अपडेट्स

जागतिक बाजारांच्या हालचालींबद्दल बोलायचं झालं तर जागतिक बाजारातून कमकुवत संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्येही २३,९०० च्या वर किंचित वाढ दिसून आली. अमेरिकेच्या वायदा बाजारात घसरण झाली. गुरुवारी निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर जोरदार चढ-उतार झाल्यानं बाजारात किंचित वाढ दिसून आली. निफ्टीची जानेवारी सीरिज आजपासून सुरू होत आहे, त्यामुळे या सीरिजमध्ये बाजाराची वाटचाल कशी होते हे पाहावं लागेल.

काल अमेरिकी बाजार कमकुवत सुरुवातीनंतर खालच्या पातळीवरून सावरताना दिसत होते. सलग पाचव्या दिवशी डाऊमध्ये तेजी आली असून ३० अंकांनी वधारला, तर नॅसडॅकमध्ये केवळ १० अंकांची घसरण दिसून आली. गिफ्ट निफ्टी २३९०० च्या जवळ फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी तर निक्केई ३०० अंकांनी वधारले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक