Join us

Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:55 IST

Stock Markets Today: आज आठवड्यातील शेवटचं व्यवहाराचं सत्र आहे आणि बाजाराचा वेग मंदावलाय. सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरून ८१,९५१ वर उघडला.

Stock Markets Today: आज आठवड्यातील शेवटचं व्यवहाराचं सत्र आहे आणि बाजाराचा वेग मंदावलाय. सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरून ८१,९५१ वर उघडला. निफ्टी १९ अंकांनी घसरून २५,०६४ वर उघडला. बँक निफ्टी १९९ अंकांनी घसरून ५५,५५६ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया १० पैशांनी कमकुवत होऊन ८७.३७/ डॉलर्सवर उघडला. यानंतर, बाजारात घसरण वाढली. सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी घसरला, निफ्टी देखील ९० अंकांनी घसरून २५,००० च्या खाली घसरला.

निफ्टी ५० वर, एनबीएफसी, मेटल, रियल्टी, प्रायव्हेट बँक यासारख्या निर्देशांकांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली. मीडिया, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये किंचित वाढ दिसून आली.

लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन

सकाळी गिफ्ट निफ्टीमधील घसरण वाढत असल्याचे दिसून आलं. तो ८१ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर थोडीशी सुधारणा झाली. जागतिक बाजारपेठेत दबाव दिसून आला. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानापूर्वी अमेरिकन बाजार रेड झोनमध्ये बंद झाले. डाउ जोन्स १५० अंकांनी घसरला, तर नॅस्डॅक सुमारे ७० अंकांनी घसरला आणि सलग तिसऱ्या दिवशी कमकुवत राहिला. त्याच वेळी, गिफ्ट निफ्टी २५,०५१ च्या आसपास व्यवहार करत होता. डाउ फ्युचर्स ५० अंकांनी वाढले आणि जपानचा निक्केई देखील किंचित वाढला.

तसे, आर्थिक आघाडीवरून भारतासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट महिन्यात, देशाच्या खाजगी क्षेत्राच्या वाढीनं विक्रमी उच्चांक गाठला आहे. नवीन ऑर्डरमध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे, सेवा क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ६५.६ वर पोहोचला, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

कमोडिटी अपडेट

कमॉडिटी मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा भाव एक टक्क्यानं वाढून प्रति बॅरल ६७ डॉलर्सच्या वर पोहोचला आहे. सोनं सध्या ३,३८० प्रति औंसवर आहे, तर चांदीचा भाव एक टक्क्यानं वाढून ३८ डॉलर्सवर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारात, चांदीचा भाव १,१५० रुपयांच्या वाढीसह प्रति किलो ₹१,१३,७०० च्या वर बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजार