Join us

Stock Markets Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, Nifty १०० अंकांनी घसरला; रिलायन्समध्ये तेजी, IT स्टॉक्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:49 IST

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१७ जानेवारी) घसरणीसह झाली. तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली.

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१७ जानेवारी) घसरणीसह झाली. तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह उघडला आणि नंतर त्यात आणखी घसरण झाली. निफ्टीही १०० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी तब्बल ४०० अंकांनी घसरला. आयटी शेअर्स कमकुवत होते. विशेष म्हणजे इन्फोसिसचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले होते. टेक महिंद्रा, एचसीएल टेक मध्येही घसरण झाली.

सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत २७ अंकांनी वधारून ७७,०६९ वर उघडला, पण नंतर त्यात घसरण झाली. तर निफ्टी ३४ अंकांनी घसरून २३,२७७ वर उघडला. बँक निफ्टी ३१९ रुपयांनी घसरून ४८,५९ रुपयांवर उघडला.

निफ्टीवर रिलायन्स, बीपीसीएल, नेस्ले इंडिया, टाटा स्टील ग्रीन झोनमध्ये उघडले. तर ट्रेंट, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एसबीआय लाइफ, पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये घसरण झाली. सकाळी गिफ्ट निफ्टी ६५ अंकांनी घसरला होता. गुरुवारी जोरदार सुरुवातीनंतर टेक शेअर्सच्या विक्रीतून अमेरिकी बाजार घसरला. सलग ३ दिवसांच्या तेजीनंतर डाऊ ७० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक २०० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. निक्केई ४०० अंकांनी घसरला.

तर दुसरीकडे परदेशी फंडांची विक्री सुरूच आहे आणि देशांतर्गत फंड खरेदी करत आहेत. गुरुवारी विकली एक्सपायरीवर एफआयआयनं ४३०० कोटी रोख रकमेसह निव्वळ ९८५० कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत फंडांनी सलग २२ व्या दिवशी २९०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक