Join us

Stock Market Updates: शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात रेड झोनमध्ये; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 09:54 IST

Stock Market Updates:  देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात सोमवारी (2 डिसेंबर) रेड झोनमध्ये झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

Stock Market Updates:  देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात सोमवारी (2 डिसेंबर) रेड झोनमध्ये झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. बँक निफ्टीतही १६० अंकांची घसरण झाली. मिडकॅप निर्देशांकातही घसरण दिसून येत होती. सेन्सेक्स ७९,७४३ वर उघडला. निफ्टी २४,१४० वर उघडला. बँक निफ्टी ५२,०८७ वर उघडला.

निफ्टीवर मारुती, सन फार्मा, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स एक ते दीड टक्क्यांनी वधारले. तर ओएनजीसी, ब्रिटानिया, एचयूएल, आयशर मोटर्स, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचडीएफसी लाइफमध्ये घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात किंचित सुधारणा झाल्याचं दिसून आलं. पण सप्टेंबर तिमाहीच्या जीडीपीच्या आकडेवारीनं थोडी निराशा केली. सप्टेंबर तिमाहीचा जीडीपी विकास दर दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. देशाची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत केवळ ५.४ टक्के दरानं वाढली. तर दुसरीकडे जीएसटी संकलन वाढतच आहे. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन ८.५ टक्क्यांनी वाढून १ लाख ८२ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आज सकाळी गिफ्ट निफ्टी ७० अंकांनी वधारून २४३७५ वर तर डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी घसरला होता. निक्केईनं १५० अंकांची घसरण दाखवली. अमेरिकी बाजारांनी शुक्रवारी अर्ध्या दिवसाच्या व्यवहारात नवे विक्रम प्रस्थापित केले. डाऊ सुमारे २०० अंकांनी उंचावून उच्चांकी पातळीवर पोहोचला आणि एस अँड पीचं नवं शिखरही गाठलं. नॅसडॅक १५० अंकांनी वधारला.

टॅग्स :शेअर बाजार