Join us

Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:00 IST

Share Market Update: मागील संपूर्ण आठवडाभर देशांतर्गत शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात कमजोर झाली आणि बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण सुरू राहिली.

Share Market Update: मागील संपूर्ण आठवडाभर देशांतर्गत शेअर बाजारामध्ये घसरण दिसून आली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात कमजोर झाली आणि बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण सुरू राहिली. ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रावर १०० टक्के शुल्क लावण्याची घोषणा केल्यामुळे आज फार्मा क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. निर्देशांक २.२% च्या घसरणीसह उघडला. निफ्टी ८० अंकांनी खाली २४,८०० च्या आसपास व्यवहार करत होता आणि त्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात तो आणखी खाली घसरला. सेन्सेक्समध्येही ३२० अंकांची घसरण होऊन तो ८३,८०९ च्या जवळपास होता. इंडिया Vix २% वर होता.

ऑटो इंडेक्समधील किंचित वाढ वगळता, बाजारातील सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात व्यवहार करत होते. LT, Eicher Motors, JSW Steel, Tata Motors, Maruti, Hero MotoCorp हे निफ्टीचे टॉप गेनर्स होते. तर, सुमारे ३ टक्के घसरणीसह सन फार्मामध्ये सर्वात मोठी घसरण झाली. त्याशिवाय, सिप्ला, एशियन पेंट, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रोमध्येही घसरण झाली.

आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा

ओपनिंगमध्ये मागील क्लोजिंगच्या तुलनेत सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरून ८०,९५६ वर उघडला. निफ्टी ७२ अंकांनी खाली २४,८१८ वर उघडला होता आणि बँक निफ्टी १७९ अंकांनी खाली ५४,७९७ वर उघडला होता. चलन बाजारात रुपया २ पैशांनी कमजोर होऊन ८८.६९/ डॉलर्सवर उघडला.

पुन्हा टॅरिफचं हत्यार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापारावर मोठा आघात केला आहे. त्यांनी १ ऑक्टोबरपासून अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडेड आणि पेटेंटेड फार्मा उत्पादनांवर १००% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, जेनेरिक औषधांबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त, अवजड ट्रक्सवर २५%, किचन कॅबिनेट आणि बाथरूम उत्पादनांवर ५०% आणि फर्निचरवर ३०% शुल्क लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत आज बाजारात घसरण अधिक तीव्र होऊ शकते आणि आज सलग सहावा दिवस असेल, जेव्हा बाजार रेड झोनमध्ये व्यवहार करतील. या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आशियाई बाजारांवर दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी ६० अंकांनी घसरून २४,९०० च्या जवळ पोहोचला. जपानचा निक्केई देखील २०० अंकांनी घसरला आहे, तर डाऊ फ्युचर्स फ्लॅट व्यवहार करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Plunges Sixth Day: Pharma Hit by 100% Tariff

Web Summary : The stock market fell for the sixth consecutive day due to Trump's tariff announcement on pharma. Nifty dipped below 24,800. Pharma stocks like Sun Pharma and Cipla saw significant declines. Asian markets also reacted negatively.
टॅग्स :शेअर बाजारडोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्ध