शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. मात्र झोडिएक एनर्जीच्या शेअरवर लोक तुटून पडले आहेत. झोडिएक एनर्जीचा शेअर शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 564.90 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका ऑर्डरमुळे आली आहे. कंपनीला किटवे, जांबियाकडून पहिली इंटरनॅशनल रूफटॉप ऑर्डर मिळाली आहे. दिवसाच्या व्यवहारादरम्यान 11,975 शेअर्सचे पेंडिंग बाय ऑर्डर्स होते. मात्र कुणीही सेलर सेलर नव्हता. झोडिएक एनर्जीच्या शेअर्सच्या 52 आठवड्यांचा उच्चांक 819.40 रुपये आहे. तर नीचांक 151 रुपये आहे.
झोडिएक एनर्जीला स्ट्रांगपॅक लिमिटेड (जांबिया)साठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमसह 2MWpr रूफटॉप सोलर सिस्टिमच्या डिझाइनिंग, इंजिनिअरिंग, सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमीशनिंगचे काम करायचे आहे. ही ऑर्डर 720,626.00 डॉलर ची आहे. कंपनीला ही ऑर्डर फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे.
ऑक्टोबर महिन्यात झोडिएक एनर्जीला अहमदाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन (AMC)कडून ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर गुजरातमध्ये ग्रिड टाइड 30 मेगावॉट ग्राउंड माउंटेड सोलर प्रोजेक्ट्सच्या डिझाइन, सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी होती. कंपनीला मिळालेल्या या ऑर्डरचे मूल्य 154.27 कोटी रुपये एवढी होती.
3 वर्षात 1400% हून अधिकची तेजी -गेल्या 3 वर्षात Zodiac Energy चा शेअर 1422% ने वाढला आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचा शेअर 37.10 रुपयांवर होता. Zodiac Energy चा शेअर 20 डिसेंबर 2024 रोजी 564.90 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 413% वाढ झाली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी Zodiac Energy चा शेअर 110.15 रुपयांवर होते. तो 20 डिसेंबर 2024 रोजी 564.90 रुपयांवर बंद झाला. तसेच गेल्या एका वर्षात या शेअरने 258% चा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)