Join us

१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:45 IST

Stock Market Holiday 2025: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (१ मे २०२५) बंद राहणार आहेत.

Stock Market Holiday 2025: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (१ मे २०२५) बंद राहणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या (BSE) अधिकृत सुट्ट्यांच्या यादीनुसार, गुरुवारी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी डेरिव्हेटिव्हज आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (एसएलबी) सेगमेंटमध्ये ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी होणार नाही.

ट्रेडिंग का होणार नाही?

शेअर मार्केट हॉलिडे कॅलेंडर २०२५ नुसार १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे दोन्ही मुंबई स्थित आहेत. त्यामुळे गुरुवारी या दोन्ही एक्स्चेंजवर इक्विटी, डेरिव्हेटिव्हआणि एसएलबी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही.

शुक्रवार, २ मे रोजी एक दिवसाच्या सुट्टीनंतर व्यवहार होणार आहेत. त्यानंतर ३ व ४ मे रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाजार बंद राहणार आहे. ५ मे रोजी सोमवार असून या दिवसापासून आठवडाभर सामान्य कामकाज होईल.

या वर्षात कधी बंद असेल बाजार?

स्वातंत्र्य दिन – शुक्रवार, १५ ऑगस्ट

गणेश चतुर्थी - बुधवार, २७ ऑगस्ट

गांधी जयंती - गुरुवार, २ ऑक्टोबर

दिवाळी (लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा) – २१-२२ ऑक्टोबर (मंगळवार-बुधवार)

प्रकाश गुरुपर्व - बुधवार, ५ नोव्हेंबर

ख्रिसमस - गुरुवार, २५ डिसेंबर

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक