Join us

बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:27 IST

Stock Market : मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली, बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० स्थिर राहिले.

Stock Market : आज मंगळवारी (२८ ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. बाजारात अस्थिरता असूनही, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० जवळजवळ सपाट पातळीवर बंद झाले. महिन्याच्या F&O एक्सपायरीमुळे बाजारात ही जबरदस्त अस्थिरता दिसून आली.

दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स १५०.६८ अंकांनी (०.१८%) घसरला आणि ८४,६२८.१६ च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी ५० इंडेक्स २९.८५ अंकांनी (०.११%) तुटून २५,९३६.२० च्या पातळीवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८५,००० च्या जवळ, तर निफ्टीने २६,००० चा टप्पा ओलांडला होता, पण तो कायम राखता आला नाही.

आजचे टॉप गेनर्स स्टॉक्सआज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सपैकी टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

कंपनीचे नाववाढ (%)
टाटा स्टीलजवळपास ३%
लार्सन अँड टुब्रो१.२३%
भारतीय स्टेट बँक०.८१%
कोटक महिंद्रा बँक०.५४%
भारती एअरटेल०.४५%

आजचे टॉप लूजर्स स्टॉकदुसरीकडे, टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंटच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.

कंपनीचे नावघसरण (%)
ट्रेंट-१.५४%
आयसीआयसीआय बँक-१.०५%
टेक महिंद्रा-१.०३%
बजाज फिनसर्व-१.००%
महिंद्रा अँड महिंद्रा-०.९८%

 

English
हिंदी सारांश
Web Title : Market Volatility: Sensex, Nifty Close Flat; Mahindra, Bajaj Shares Fall

Web Summary : Indian stock market witnessed volatility. Sensex fell 0.18%, Nifty 0.11%. Tata Steel gained, while Trent saw the biggest drop. F&O expiry caused the fluctuations.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी