Join us

Stock Market Updates: घसरणीसह शेअर बाजार उघडला, निफ्टी २४,७०० च्या खाली; Godrej Consumer ८% घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:59 IST

Stock Market Updates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून ८१,६०२ च्या पातळीवर खुला झाला.

Stock Market Updates: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स १०६ अंकांनी घसरून ८१,६०२ च्या पातळीवर खुला झाला. एनएसईचा ५० शेअर्सचा इंडेक्स निफ्टी ५० नं दिवसाची सुरुवात ४३ अंकांच्या घसरणीसह २४,६३३ च्या पातळीवर केली.

कमकुवत जागतिक संकेतांनंतर देशांतर्गत शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सोमवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर दुसरीकडे आज आशियाई बाजारांमध्ये प्रामुख्याने घसरण झाली. तर, गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला होता. नॅसडॅक आणि एस अँड पी ५०० विक्रमी पातळीवर बंद झाले.

शुक्रवारी बाजारात किंचित घसरण झाली असली, तरी बाजारात रिकव्हरी दिसून आली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) शुक्रवारी पुन्हा विक्री झाली. सलग तीन दिवस खरेदी केल्यानंतर शुक्रवारी एफआयआयनं रोखीनं विक्री केली. कॅश आणि स्टॉक फ्युचर्समध्ये सुमारे ३४२५ कोटी रुपयांची विक्री झाली.

यामध्ये तेजी / घसरण

सोमवारी कामकाजादरम्यान एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली. गोदरेज कन्झ्युमर ८ टक्क्यांनी घसरला होता. याशिवाय एचयूएल, मॅरिको, डाबर मध्येही घसरण झाली. फार्मा, हेल्थकेअर, ऑटो मध्येही घसरण झाली. प्रायव्हेट बँक, रियल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी होती.

टॅग्स :शेअर बाजार